‘कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेतले ‘देखणे’पण आपल्या सर्वांना मिळो’ दिवाळीच्या निमित्ताने या  शुभेच्छा !!

देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥
तेच डोळे देखणे, जे कोंडीती सार्‍या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥
देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे।
आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥
देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे ॥
देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा, स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणे ते स्कंध ज्या ये, सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां, निश्चये पाळावया ॥
देखणी ती जीवने, जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणे ज्यातुन वाहे, शुभ्र पार्‍यासारखे ॥
देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो, रात्रगर्भी वारसा ॥

-बा. भ. बोरकर.

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. सुंदर, अप्रतिम काव्य!

 2. बोरकर देखणेपणाचा नवा अर्थ सहजपणे उलगडून दाखवतात
  तेच डोळे देखणे जे आकाशव्यापी दु: खाला कवेत घेतात . हे देखणेपण खरे श्रेयस आहे .

 3. Apratim

 4. देखणेपणा म्हणजे दिसायला सुंदर असाच समज होता, ह्या कवितेने वेगवेगळ्या प्रकारे देखणेपण पाहता आले
  फार मस्त

 5. very nice

 6. sundar

 7. बाकीबांचे हे काव्य आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे कुठेतरी मिळते जुळते आहे असेच वाटते !!
  प्रदीप जोशी

 8. असे सर्वांगी देखणेपण प्राप्त होणे जाऊदे, किमान ते समजणारी नजर मिळाली तरी भरुन पावलो असं वाटेल.

 9. sundar

 10. apratim ……. kalpanashaktila salam