‘‘मी सिगारेट सोडली-मी सिगारेट सोडली-कायमची सोडली-यापुढे सिगारेट वर्ज्य-प्राण गेला तरी सिगारेट नाही ओढणार-माझा निश्चय कायम-त्रिवार कायम.’’-वास्तविक हे मी कुणालाही सांगत नाही-माझे मलाच सांगतो आहे. हा आजचा प्रसंग नाही-हे अनेकवेळा मी माझे मलाच सांगितले आहे. सिगारेट सोडण्याविषयी मी माझ्या धुरकट मनाला आजपर्यंत जो उपदेश केला आहे तो जर श्लोकबद्ध केला असता तर मनाच्या श्लोकासारखे माझे धुराचे श्लोक घरोघर म्हटले गेले असते. पण चार चरणांचा श्लोक तयार करणे हे माझ्या आवाक्यापलीकडले काम आहे. म्हणून बहुधा हा उपदेश मी गद्यातच करतो-मना, ह्या धुराच्या भोवऱ्यात फसू नकोस. रोज अडीच-तीन रुपयांची राख करणे हे बरे नव्हे. हे सज्जन मना-हा मोह आवर. बाकी मनातल्या मनात देखील माझ्या स्वत:च्या मनाला ‘ मना सज्जना ’ म्हणताना मला लाजल्यासारखे होते. ह्या माझ्या अचपळ मनाची-माझी बालपणापासूनची ओळख आहे-तरी देखील त्या माझ्या मनाला माझा मीच गोंजारीत असतो. वास्तविक हे स्वत:च्या गळ्यात हात घालून आपणच आपल्याला आलिंगन देण्यापैकी आहे.

बाकी सिगारेट सोडण्याचा किंवा अशाच प्रकारच्या सन्मार्गाने जाण्याचा उपदेश करणारा हा कोण आपल्या अंत:करणात दडून बसलेला असतो हे काही कळत नाही. पुष्कळदा वाटते की ‘आत्मा आत्मा’ म्हणून ज्याला म्हणतात तो हा प्राणी असावा.पण मन देखील अंत:करणातच असावे. मला वाटते ‘मन’ हे आत्म्याकडे पोटभाडेकरू म्हणून रहात असेल. आणि एखाद्या प्रेमळ घरमालकाने गच्चीवरच्या एका खोलीत भाड्याने रहाणाऱ्या आणि वेळीअवेळी भटकणाऱ्या कॉलेजविद्यार्थ्याला नीट वागण्यासंबंधी उपदेश करावा त्याप्रमाणे हा ‘आत्माराम’पंत त्या ‘मन्याला’ उपदेश करीत असावा. पूर्वी काही नाटकांतून आत्मारामपंत, विवेकराव, क्रोधाजीबुवा, मनाजीराव वगैरे पात्रे असत. त्यांची अशावेळी आठवण येते. ‘मन’ हे नेहमी उनाड. ते नाही नाही त्या ठिकाणी जडते. कुठे कुणाच्या केसांच्या महिरपीतच गुंतेल-तर कुठे एखाद्या नाजूक जिवणीजवळ उगीचच फेरी घालून येईल-बरे ही जडायची ठिकाणे काय मोठी-काव्यमय-सुंदर-मोहक असायला हवीत असे थोडेचे आहे. नाक्यावरच्या हॉटेलात संध्याकाळी-पहिली कांद्याची भजी चुरचुरायला लागली की धावले तिथे. चौपाटीवरच्या वाऱ्याबरोबर येणाऱ्या भेळवाल्याच्या ठेल्याची खबर नाकाशी आली की विवेकराव-क्रोधाजीराव-आत्मारामपंत वगैरे मंडळींना न जुमानता धावले तिथे-छे-‘मन ओढाळ ओढाळ’ म्हटले आहे ते काय खोटे नाही. मला वाटते मनाचा ओढाळपणा सिगारेट, विडी, हुक्का, चिलीम वगैरे ओढण्यात जितका शाबीत होतो तितका इतरत्र कुठेही होत नसेल.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर सभासदत्वाचे विविध पर्याय उपलब्ध असून त्यातील आपल्याला योग्य वाटेल असा पर्याय निवडा. आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

अभिप्राय द्या...

This Post Has 9 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

    1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..