भाषा आणि संस्कृती यात जर काळानुरूप बदल झाला नाही तर त्या लुप्त होण्याची शक्यता अधिक असते. लखनऊ, भोपाळ आदी शहरांची खास वैशिष्ट्य असलेली ‘पहले आप – पहले आप’ अशी अती अदबशीर मुस्लिम संस्कृती व अनेक शायरांना ‘हाल-ए-दिल’ आणि दस्तूर-ए-जमाना सांगण्यासाठी नजाकतदार, लफ्फेदार शब्द भांडारं खुली करून देणारी उर्दू भाषा या दोन्ही आजघडीला ‘जाने कहाँ गये वो दिन’ अशी खंत व्यक्त करण्यापुरत्या शिल्लक उरल्या आहेत. या भाषेत नियतकालिकं अजूनही प्रकाशित होतात परंतु व्यवहारातून ती भाषा हद्दपार झाली आहे. उर्दू जिवंत आहे ती केवळ गालीबपासून तर बहादूरशाह जफरपर्यंतच्या शायरांनी आपल्या भावनांना उर्दूचं अंगडं घातलं म्हणून! एकेकाळी राजवैभव उपभोगलेल्या या भाषेच्या आजच्या स्थितीबद्दल खंत व्यक्त करण्यासाठी मर्चंट आयव्होरी प्रॉडक्शन्सनं ‘मुहाफिज’ (इंग्रजीत ‘इन कस्टडी’) या अतिशय परिणामकारक चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात उर्दू भाषा ही मुख्य विषय म्हणून येत असली तरी प्रत्यक्षात ती प्रतिक  म्हणून वापरलेली आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्षाचं रूप घेऊन ती वैश्विक आशय सांगते. परंपरा श्रीमंत, संपन्न असल्या तरी त्या कालौघात कधीतरी कालबाह्य ठरतातच,त्या थोपवू पाहणारेही आपण हे थांबवू शकणार नाही हे माहिती असून लढत असतात. हा चित्रपट एक प्रकारे  परंपरांचं शोकगीत आहे आणि केवळ उर्दू भाषेलाच नव्हे तर अनेक बाबतीत ते लागू होतं. कथा, संवाद वातावरण निर्मिती व इच्छित परिणाम या सर्वच बाबतीत हा चित्रपट म्हणजे कालप्रवाहाचे प्रभावी चित्रण करणारा एक अनुभव आहे.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..