बाळशास्त्री जांभेकरांचे नाव घेतल्यावर अनेकांना त्यांनी १८३२ साली सुरू केलेले ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र आठवते आणि तेवढ्यावरच जांभेकरांचे कार्य संपते. प्रत्यक्षात जांभेकर हे अद्भूत आणि अफाट व्यक्तिमत्व होते. दर्पण हे इंग्रजी-मराठी वृत्तपत्र सुरु केले तेव्हा ते केवळ  २० वर्षांचे होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी, बंगाली, गुजराती एवढ्या भाषांचे तसेच भूगोल, गणित अशा विषय़ांचे अव्वल दर्जाचे आकलन होते.  त्यांचे चरित्र प्रसिद्ध झाल्यावर त्याचे समीक्षण करण्याच्या निमित्ताने काहींनी जांभेकरांवरच टीका केली तेव्हा उद्विग्न होऊन १९५३  साली  ‘चित्रमयजगत्’ मध्ये आलेल्या या लेखामधून दिसणारे जांभेकर पाहिले तर आपण थक्क होतो. एकाच आयुष्यात एवढे काही करणे कसे शक्य आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो-

यावेळी हा दीर्घ लेख आपण जाणीवपूर्वक दोन भागात प्रसिद्द करतोय. जेणेकरून वाचनाचा उत्साह टिकून रहावा, आणि दर्पणकारांबद्दलची ही मोलाची माहिती डोक्यात नोंदवली जाण्यास पुरेसा अवसर मिळावा.

********

‘आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे जीवनवृत्त व लेखसंग्रह’ प्रसिद्ध होऊन दोनअडीच वर्षे झाली. हा त्रिखंडात्मक अपूर्व ग्रंथ प्रसिद्ध करून ‘लोकशिक्षण-’ कार श्री. गणेश गंगाधर जांभेकर यांनी मराठी चरित्रवाङ्‌मयात मौलिक महत्त्वाची भर घातली, आणि त्याबरोबरच पश्चिम हिंदुस्थानातील इंग्रजी सत्तेच्या आरंभकाली उदय पावलेल्या एका असामान्य बुद्धीच्या व कर्तृत्वाच्या महाराष्ट्रीय विभूतीचे यथातथ्य दर्शन महाराष्ट्राला घडविले. साहजिकच या ग्रंथाचे अनेकांकडून कौतुकास्पद स्वागत झाले. पण एक-दोन वृत्तपत्रांतून त्यावर अधिकांत अधिक कडक बेजबाबदार टीकाही झाली. विशेष वाईट वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, ह्या वावदूकपणात ग्रंथ व ग्रंथकार यांच्यासमवेत ग्रंथविषय कै. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे सुद्धा अधिक्षेपाच्या तडाख्यात सापडले! ग्रंथकारांनी वर्णिल्या प्रकारचे ते नवयुगप्रवर्तक पुरुष नाहीत, असे सिद्ध करण्याच्या भरात बाळशास्त्री हे इंग्रज राज्यकर्त्यांच्या आज्ञेनुसार निरनिराळ्या विषयांवर शाळकरी पोरांकरिता चार सामान्य क्रमिक पुस्तके लिहिणारे केवळ तात्या पंतोजी होते, असेही म्हणण्याचा विक्रम एखाद्या छद्मी टीकाकाराने केला!

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 7 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

    1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..