लेखक: दत्तप्रसाद दाभोळकर

मी कवी आहे, असे मी समजतो. भोवतालचे कोणीही असे काही समजत नाहीत, हेपण मी समजून आहे!

मी कवी आहे, असे मी समजतो, यालाही कारण आहे. ‘कवितारती’ हे कवितेला वाहिलेले मराठीमधील एकमेव मासिक आहे. गेल्या वर्षी त्या मासिकाने आपला ‘रौप्यमहोत्सव’ साजरा केला. त्या मासिकात सलग पंचवीस वर्षे दिवाळी अंकात माझी कविता असते. कविता असते, यालाही कारण आहे. दरवर्षी दिवाळीला दोन-तीन महिने असताना मासिकाचे संपादक प्र. पुरुषोत्तम पाटील यांचे आग्रहाचे पत्र यायचे – ‘‘तुमच्या कवितेशिवाय आमचा दिवाळी अंक संपन्न होणार नाही. कविता पाठवा.’’ माझी आणि प्रा. पुरुषोत्तम पाटील यांची तोंडओळखसुद्धा नव्हती. ती झाली चार-पाच वर्षांपूर्वी. गेल्या वर्षी पंचवीस वर्षांतील ‘कवितारती’मधील शंभर निवडक कवितांचा त्यांनी संग्रह काढला, त्यातही त्यांनी माझी कविता घेतली. आता हे एवढे, मला माझ्यापुरते, मी कवी आहे असे समजण्यास पुरेसे आहे!

पण खरी अडचण पुढची आहे. साताऱ्यासारख्या छोट्या शहरातसुद्धा मी कवी आहे, असे कोणी चुकूनही समजत नाही. मोठी कविसंमेलने राहू द्या, अगदी गावातील कविसंमेलन असले, तरी मला कुणी बोलवत नाही! माझ्या जवळच्या मित्रांनाही मी कविता करतो असला काही संशय नाही. ते राहू द्या, मी अगदी हट्टाने माझ्या मुलीला कॉन्व्हेंटमध्ये न घालता, मराठी माध्यमाच्या शाळेत घातले होते. पण तिला जर कुणी सांगितले, की मी कविता करतो, तर ती म्हणेल, ‘‘नॉनसेन्स! असले काही करत वेस्ट करण्याएवढा टाइम माझ्या डॅडकडे नाही!’’ आणि अगदी खासगीतले सांगतो, इतर (अगदी साध्यासाध्या!) मासिकांच्याकडून माझ्या कविता ‘साभार परत’ पण येत असतात!

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 15 Comments

 1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

 10. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..