राष्ट्राच्या राजकारणातही पाय पसरण्याची पठाणी वृत्ती अन् अंग चोरून बसण्याची हिंदु वृत्ती या दोन वृत्ती संभवतात. या हिंदु वृत्तीलाच दलवाई यांनी आकुंचनवादी वृत्ती म्हटलं आहे. पण त्यांनी दोष पुढाऱ्यांना दिलेला नसून, त्या पुढाऱ्यांना योग्य क्षणी हाकून न देणाऱ्या जनतेला दिला आहे.   हिंदुसमाज आज चैतन्यहीन झाला आहे. अन् म्हणून त्यानं निवडलेलं सरकार हे आज पडखाऊ अथवा Defeatist असणारच, असा दलवाई यांचा ‘ थीसिस ’ आहे. दलवाई इथेच थांबत नाहीत, ते खरे राष्ट्रवादी असल्यानं, हिंदुसमाजात चैतन्य आणण्याकरिता काय केलं पाहिजे हे सांगायलाही ते भीत नाहीत. आमच्यातील काही शहाणे त्या विश्लेषणाकडे काणाडोळाही करतील. पण एक मुसलमान लेखक हिंदु-मुसलमान दोन्ही समाजांची इतराजी पत्करून हे विचार तळमळून मांडतो, हे नवीन खास आहे…आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ मध्ये दोन लेख लिहून दलवाई यांनी केलेल्या विश्लेषणावर समीक्षक श्री. के. क्षीरसागर यांनी केलेली ही मार्मिक टिप्पणी-

********

‘ थीसिस ’ हा शब्द मी या ‘संवादांत’ कम्युनिस्ट मंडळी वापरतात, त्या अर्थाने वापरीत आहे. कम्युनिस्ट लोक भावी धोरण ठरविण्याकरिता जेव्हा जमून आपसांत चर्चा करतात. तेव्हा त्यांच्यातील काहीजण आपले विचार आणि विश्लेषण ‘प्रबंध’ रूपाने पक्षापुढे मांडतात. त्याला ते ‘थीसिस’ म्हणतात. तरुण मुसलमान लेखक हमीद दलवाई यांनी आचार्य अत्रे यांच्या मराठ्यात अलीकडे जे दोन महत्त्वाचे लेख लिहिले आहेत, त्यांना माझ्या मते अशा ‘थीसिस्‌’चेच स्वरूप असल्यानं, मी तो खास राजकीय शब्द वापरीत आहे. नाही तर कुणाला वाटायचं की, तरुण हमीद दलवाई ‘पीएच्‌.डी.’ला बसत आहेत!

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 5 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

    1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..