आठवड्यानंतर सोनी खूपच मोकळी वागू लागली. माझ्याजवळ बसण्या-उठण्यातला संकोच गेला. गॅलरीत उभं राहिल्यावर ती मोकळेपणानं खेटून उभी राही. आमच्यात खरी मैत्री झाली होती. तिथून कुठं दुसरीकडं जाण्याचं मनात आलं की हात ओढून ती म्हणू लागली होती, “चल! कैऱ्या पाडायच्या का?” एकदा गॅलरीत उभं असता ती म्हणाली, “तू आल्यामुळंच मी इथं येऊन उभी राहू लागले. गेले चार महिने गॅलरी मी बंद केली होती.” मी विचारलं, “का?” ती म्हणाली, “हळूच डावीकडे मान वळवून पाहा. पाहातोस असं दाखवू नको….

********

बाबांच्या मित्रांना मी काका म्हणत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी दोन वेळा काकांच्या गावी गेलो होतो. एकदा आठ वर्षांचा असताना. दुसऱ्यांदा सोळाव्या वर्षी.

आधी कित्येक दिवस काका आले की बाबांना म्हणत होते, “उन्हाळ्यात बबनला आमच्याकडे पाठव. सोनी आहेच. दोघं खेळतील.” शेवटी बाबा मला पाठवायला तयार झाले. पहिल्या वेळी काकाच स्वतः येऊन मला घेऊन गेले. दुसऱ्या वेळेला मी त्यांच्या गावी गेलो तेव्हा एकटाच गेलो.

दुसऱ्या वेळी गेलो तेव्हा पहिल्यावेळचं फार पुसट आठवत होतं. काकांच्या घराभोवतालची मोठाली झाडं. सर्वत्र पडलेला पाचोळा. “सांभाळून रे!” पाचोळ्यातून धावताना सोनी मला ओरडली होती. काटा टाळण्यासाठी, सबंध पाऊल न टेकता चवड्यावर कसं धावायचं, तिनं धावून दाखवलं होतं.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 9 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  9. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..