आपण कुठेही बाहेरगावी निघालो की प्रथम  त्या गावात राहण्या-खाण्याचा काय बंदोबस्त आहे ते पहातो . सध्याच्या इंटरनेट युगात तर हे काम एका ‘क्लिक’ सरशी होते. संगणकाशी चार-पाच मिनिटं खेळून आपण जिथे निघालो आहोत तिथलं एखादं हॉटेल  बुक  करून  निश्चिन्त होतो. मध्ययुगीन हिंदुस्थानात अशी हॉटेलं होती का ? हिंदुस्थानाबाहेरून जे  लोक (परदेशी प्रवासी ) येथे यायचे, ते आपल्या राहण्या-खाण्याची काय सोय करायचे? चला पाहूया गतकाळात डोकावून !

मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलांविषयी आपल्या परदेशी प्रवाशांच्या वृत्तांतातून माहिती मिळते. १७ व्या शतकामध्ये बरेच युरोपियन प्रवासी हिंदुस्थानात येत. काही जण व्यापारासाठी , काही जण डॉक्टर म्हणून , काही जण सैनिक म्हणून , काही जण आपल्या राजाचे प्रतिनिधी म्हणून , काही जण साहस करण्याच्या ओढी पायी तर काही जण केवळ उत्सुकता म्हणून येथे येत. या पैकी बहुतेक प्रवाशांनी आपण हिंदुस्थानात काय पाहिले, कसे राहिलो , कसा प्रवास केला , येथील लोक कसे आहेत याबाबत तपशीलवार लिहून ठेवले आहे . त्यांचे प्रवासवृत्तांत मनोरंजक आणि माहितीपूर्ण तर आहेतच , शिवाय या प्रवासवृत्तांतां मधून आपल्याला आधुनिक काळातील काही गोष्टी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या काळातही अस्तित्वात होत्या ! हे  वाचून आश्चर्य वाटते . या गोष्टींपैकींच एक  गोष्ट म्हणजे हॉटेलं!

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..