भारताला स्वातंत्र्य मिळाले  आणि त्यानंतरच्या मोकळ्या हवेत देश,समाज घडवण्याचे, प्रत्येक क्षेत्राला आकार देण्याचे प्रयत्न जोमात सुरु झाले. आता आपल्या स्वातंत्र्यावर कोणीच घाला घालू शकणार नाही असा विश्वास स्वातंत्र्यानंतरच्या २८ वर्षात सरकारनं निर्माण केला होता. परंतु अचानक २५ जून १९७५ रोजी या स्वातंत्र्याचा संकोच झाला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी जाहीर केली. २१ महिने देशाने हा वादळी कालखंड अनुभवला. दुसरा स्वातंत्र्य लढा, लोकशाहीचा खून, अनुशासन पर्व, स्वातंत्र्यावर घाला अशा विविध शब्दांनी या पर्वाचा उल्लेख होतो. भारतीय राजकारण,समाजकारण आणि भारतीयांच्या सामाजिक धारणा यांच्यात बदल टोकाचे बदल होण्याची प्रकिया याच काळात सुरु झाली. त्याचे प्रतिबिंब अमिताभच्या अँग्री यंग मॅनच्या उदयापासून तर विविध सामाजिक-सांस्कृतिक चळवळी थंडावण्यापर्यंतच्या अनेक बाबींमधून पुढील काळात उमटले. आणिबाणीच्या या सर्वांगीण परिणामाचा, कारणांचा, त्याला झालेल्या विरोधाचा वेध या महिन्याच्या विशेषांकात घेत आहोत आणि त्या कालखंडात पुनश्र्च एक वैचारिक फेरफटका मारत आहोत. या मालिकेतला हा पहिला लेख.

आणिबाणीच्या काळात अनेक नेते तुरुंगात गेले. तुरुंगातही त्यांनी आपापल्या परीने आणि पद्धतीने लढा आणि निषेध सुरुच ठेवला होता. मृणाल गोरे या त्यातीलच एक झुंजार नेत्या. अटकेपासून वाचण्याचे प्रयत्न फसल्यावर अखेर त्यांना अटक झालीच. त्यांना सतत एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात येत होते. या दरम्यान त्यांनी पाहिलेले कैदी, तुरुंगातील अव्यवस्था आणि वेळोवेळी त्यांनी केलेला संघर्ष त्यांच्याच शब्दात-

********

माझी भांडणे, माझा आग्रह

आर्थर रोड, अकोला, धुळे, येरवडा, चार कारागृहातील माझा वर्षा-सव्वा वर्षाचा तुरुंगवास! आता मागे वळून पाहिले म्हणजे या सगळ्या कालखंडाची मोठी गंमत वाटते, सुखदु:खाचे अनेक प्रसंग आठवतात. पण त्यातून ध्यानात राहिले आहेत ते या काळातील समर प्रसंग! कोणत्याही तुरुंगात अन्यायाने वागणाऱ्या कोणाशी माझं भांडण झालं नाही असं नाहीच. माझा स्वभाव भांडखोर आहे का? मला मनापासून वाटत नाही मी भांडखोर स्वभावाची आहे. पण अन्याय दिसला की राहावतच नाही. त्याला मी तरी काय करणार? अन्यायाविरुद्ध उभं राहाण्यासाठी मन उसळून येतं.

आता, मला अटक झाली तोच दिवस पहा ना. एका मोठ्या तुरुंगातून मी छोट्या तुरुंगात कोंडली गेले तो दिवस २१ डिसेंबर १९७५.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..