दोन लेख, दोन भावना यातलं अंतर केवळ दीड वर्षाचं परंतु त्यात केवढी तफावत? पुनश्चच्या वाचकांनी विनय हर्डीकर यांच्या ‘जनांचा प्रवाहो चालला’ या पुस्तकातला लेख ‘अवांतर’ या सदरात वाचला. आणिबाणी उठल्यानंतर लगेचच म्हणजे १९७७ च्या एप्रिल महिन्यातला तो लेख होता आणि त्यात ‘दुसऱ्या स्वातंत्र्याचा’ आनंद काठोकाठ भरून वाहताना दिसत होता. त्यानंतर दीड वर्षांनी, १९७८च्या दिवाळीत रुचीच्या अंकात आलेला लेख आज देत आहोत. हे दोन लेख निवडण्यामागं एक सूत्र आहे. आधीचा लेख होता तो आणिबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधींना लोकांनी धडा शिकवला याचं समाधान आणि निवडणुकीच्या राजकारणात जे एरवी तगले नसते अशा चारित्र्यसंपन्न नेत्यांना सत्तेत जागा मिळाल्याच्या आनंदाचा. परंतु दरम्यानच्या दीड वर्षात हर्डिकरांचा पुरेसा अपेक्षाभंग झाला असावा. प्रस्तुत लेख साहित्यिकांच्या दुटप्पी आणि कचखाऊ बोलण्या-वागण्यावर टीका करत सुरू होतो,साहित्याच्या समीक्षेकडे जातो आणि अखेर सर्वव्यापी निराशा व्यक्त करण्याकडे वाटचाल करतो. हा लेख प्रसिध्द झाल्यावर आठ-दहा महिन्यातच निवडणूक होऊन काँग्रेस आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. हर्डीकरांना मात्र द्रष्टाच म्हटले पाहिजे. कारण आज ४० वर्षांनी हा लेख पुनः वाचकांसमोर आणला जात असताना पक्षांची नावे बदलली आहेत, परिस्थिती बरीचशी तीच आहे. तेव्हा ज्यांनी प्रत्यक्ष आणिबाणी लादली त्यांच्यावर आता अप्रत्यक्ष आणिबाणीच्या नावानं ओरड करायची वेळ आली आहे. हर्डिकरांनी निवडलेले शिर्षक भविष्यसूचक होते की काय?

********

‘जनाचा प्रवाहो चालिला’चा साहित्यविषयक after-math तुम्ही लिहावा’ असं संपादकांनी सुचवलं आहे म्हणून त्यापासूनच सुरुवात करतो. पुस्तकावर साधारण दोन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पहिला प्रकार असतो सर्वसाधारण वाचकांच्या प्रतिक्रियांचा आणि दुसरा असतो साहित्य क्षेत्रातल्या मंडळींच्या, म्हणजे लेखक, समीक्षक, प्राध्यापक आणि सर्वसाधारण ज्यांना आपण बुद्धिजीवी म्हणून ओळखतो त्याच्या प्रतिक्रियांचा. त्यामधला विषयाला प्रस्तुत भाग तेवढा सांगतो. सामान्य वाचकाला पुस्तक आवडते, आणि त्याला खरी उत्सुकता असते ती ज्यांच्यावर मी प्रकट-अप्रकट टीका केली आहे त्यांना काय वाटलं ते जाणून घेण्याची. पु.ल. काय म्हणाले, पाध्ये काय म्हणाले, करंदीकरांची काय, असे प्रश्न ही मंडळी परत परत विचारतात. माझी टीका त्यांना रास्त वाटत असते आणि या मंडळींनी त्यावर विचार करून स्वत:ची भूमिका मांडावी अशी त्यांची अपेक्षा दिसते.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..