निवडणूकपूर्व सल्लामसलत आणि विचार विमर्श करण्यासाठी कमळ संस्थानचे राज्याधिपती, धनुष्यबाणनगरीचे विद्यमान सर्वोच्च नेतृत्व नंबर एक आणि विद्यमान सर्वोच्च नेतृत्व नंबर दोन भेटतात तेव्हा-

********

वेळ- अपवेळ.

पात्रे- कमळ संस्थानचे राज्याधिपती, धनुष्यबाणनगरीचे विद्यमान सर्वोच्च नेतृत्व नंबर एक आणि विद्यमान सर्वोच्च नेतृत्व नंबर दोन.

भेटीचा हेतू- खलबते.

राज्याधिपती – गेल्या महिन्यात मी चारवेळा टीका केली तुमच्यावर. पण तुम्ही माझ्यावर पाच वेळा केली बुवा. आपलं चारच वेळा टीका करायचं ठरलं होतं.

सर्वोच्च१- काहीतरी गडबड झाली मोजण्यात. मिलिंदपंत म्हणाले की एकदा टीका करायचं शिल्लक आहे, म्हणून मी महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी टीका केली बघा, कोटा पूर्ण करण्यासाठी.

सर्वोच्च२- बाबा, तुमच्या लक्षात राहात नाही हल्ली. तरी मला वाटलंच होतं की चारदा करून झाली आहे टीका.

राज्याधिपती – असू देत. चला, आता या महिन्याचंपण ठरून टाकू. नाणार होणार म्हणजे होणार, मी कोकणचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, असं मी गुरूवारी दाबून सांगणार आहे.

सर्वोच्च१- बरं, मग शुक्रवारी मी बोलतो. नाणार होणार नाहीच, नाणार जाणार म्हणजे जाणार….

सर्वोच्च२- बाबा, नाणार वरून त्याच त्या ऱ्हाइम ऐकून मलासुध्दा कंटाळा आहे. आता वेगळं काही तरी बोला ना..

सर्वोच्च- वेगळं? (डोकं खाजवून विचार करतात) बरं, मग हा कोकणचा विकास नव्हे भकास…

सर्वोच्च२- नको नको, हे पण झालंय बाबा खूपदा…

सर्वोच्च- अरे पण तेच तेच बोलायचं असतं नाही तरी. नवीन काय बोलणार?

राज्याधिपती – एक काम करा नं. सेनाप्रमुखांच्या काळापासून आम्ही कोकणात पाय रोवून उभे आहोत वगैरे सांगून टाका…ही टेप तुम्ही बऱ्याच दिवसांत लावलेली पण नाही.

सर्वोच्च१- बरं, ठिक आहे. हीच टेप वाजवतो, त्यात नाणारचा मुद्दा कसा घालायचा ते बघतो मी.

राज्याधिपती – बरं, तुमच्या त्या सुभाष देसाईंना सांगून टाका ना हो. नाणार झालं तं मी राजीनामा देईन, नाणार झालं तं मी राजीनामा देईन…असं ते बोलत असतात, पण त्यात काही दम नसतो बुवा, कोणालाच तं खरं नाही वाटत ते. जरा जोरानं बोलायला सांगा नं त्यांना.

सर्वोच्च२- जोरात बोललो तर खरंच राजीनामा द्यावा लागेल की काय, अशी भीती वाटत असेल त्यांना…

(तिघेही हसून एकमेकांना टाळ्या देतात)

राज्याधिपती – बरं, या महिन्यात आपण थोडं युतीविषयी पण बोलू. आमच्या बाजूनं युती आहेच, निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असं मी बोलेन.

सर्वोच्च१- निर्णय घेणारा मी कोण? माझे शिवसैनिक निर्णय घेतील, ही जनता ठरवेल काय करायचं ते, असं बोलेन मी. चालेल?

सर्वोच्च२- बाबा, हेही आता थोडं चेंज करूया आपण.  हे बघा, ( दोन्ही हात हवेत फैलावून म्हणून दाखवतो) मित्र आहात तर मित्रासारखे वागा. तुम्ही खांद्यावर हात ठेवाल तर आम्ही खांद्यावर ठेवू, तुम्ही पाठीत वार करणार असाल तर आमचे हातही बांधून ठेवेलेले नाहीत, वाघाचे बच्चे आहोत आम्ही..चांगलं वाटतं का हे?

राज्याधिपती – (कौतुकानं पाहात) बिलकुल मस्त! पण हे थोडं लवकर होणार नाही का? नंतर शेवटी शेवटी आपल्याला हेच तं बोलाचं आहे नं..

सर्वोच्च१- तेव्हा परत बोलू. एवढं कुठं कोणाच्या लक्षात राहतं? पण फार जास्तही नको व्हायला. परवा आमचा एक जण विचारत होता, आपण राजीनामे कधी द्यायचे म्हणून!

राज्याधिपती – आमच्याकडे पण आहेत ना असे. एकाच सरकारमध्ये राहून रोज रोज जाहीरपणे भांडण्यापेक्षा, द्या यांना सोडून आणि घ्या पवारांचा पाठींबा, असं म्हणत होता एक जण परवा मला.

सर्वोच्च२- बाकी पवार काय म्हणतात? आघाडीचं काय चालू आहे?

राज्याधिपती- एवढ्यात काही बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी. पण आघाडी होणार आहेच.

सर्वोच्च१- पण त्याचं म्हणणं काय आहे?

राज्याधिपती- तेही तेच म्हणाले, एवढ्यातच जाहीर वाद कशाला घालता, पुढे तेच तर करायचं आहे.

सर्वोच्च१- आपल्याविषयी नाही, त्यांच्याविषयी काय म्हणाले?

राज्याधिपती –  (टाळीसाठी हात पुढे करत) ते स्वतःविषयी कधी बोलतात का? बिलकुल नाही!

सर्वोच्च२- पण तुम्हाला काय वाटतं? लोकांचा मूड काय आहे?

राज्याधिपती – बिलकुल! आपणच येणार पुन्हा.

सर्वोच्च१- प्रश्न फक्त मोठा भाऊ कोण होणार एवढाच आहे… (हसत हसत) हे मी नाही, आपली वर्तमानपत्र म्हणतात.

राज्याधिपती – हे पाहा, दुधात पाणी टाकलं काय आणि पाण्यात दूध टाकलं काय, लोकांना तं जे मिळायचं तेच मिळणार आहे! आपलं तं हे तत्वज्ञान आहे बुवा.

सर्वोच्च२- वांद्रे इम्पॅक्ट काही असेल का? काय वाटतं तुम्हाला? मध्ये शांत होते, आता जरा जरा आवाज करत आहेत ते.

राज्याधिपती – त्यांना पण त्याचं दुकान चालवायचं आहे ना राजे हो! त्यांचं काय आहे सागूं का, पावसाळा आला की सेल लावा, उन्हाळा आला की भाव वाढवा, हिवाळा आला की स्वेटर विका…त्यामुळं त्यांच्या दुकानात काय मिळतं ते लोकांच्या लक्षात राहात नाही आणि त्यांच्यापण लक्षात राहात नाही..

(सर्वोच्च१ आणि सर्वोच्च२ फारच खूश होऊन टाळ्या देतात)

सर्वोच्च१- तरी सावध रहायला हवं. तुम्ही मालवणच्या खाजा कागदात गुंडाळून ठेवला  ते बरं केलं.

राज्याधिपती- मग काय तं! उघडा ठेवला तं माशा बसतात आणि आपल्यालाच त्रास देतात. घेतला राज्यसभेचा कागद आणि ठेवला गुंडाळून.

सर्वोच्च१- बाकी तुमच्या ग्रामविकासवाल्या बाई, शिक्षणवाले बुवा आणि हभप जळगावकर काय म्हणतात?

राज्याधिपती- आमच्या वऱ्हाडातलं एक तुम्हाला माहित नाही. पावसाळ्यात आमच्याकडे बेडकाचे पिल्ले फिरत असतात. पिल्लू दिसलं की आम्ही एखादा बिनकामाचा डबा, रिकामी बादली असं काहीतरी घेतो आणि त्याच्याखाली त्या बेडकाला कोंडून टाकतो. म्हणजे त्याला श्वास घ्यायला हवा तं मिळते पण बाहेर काही येता येत नाही…तसंच केलं आहे मी या सगळ्यांच.

(यावर तिघेही डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसतात)

सर्वोच्च१- (डोळ्यांतलं पाणी पूसत) बरं मग, या महिन्यातलं ठरवून टाकू. नाणार वरून दोन वेळा एकमेकांना हाणायचं आणि युतीवर दोनदा बोलायचं. लोकांची कामं करता येत नसतील तर आम्हाला सत्तेत रस नाही असं म्हणेन मी. चालेल?

सर्वोच्च२- पण बाबा आता एवढी वर्ष काढली आपण सत्तेत तर या काळात काय केलं हेही थोडंफार सांगायला पाहिजे.

सर्वोच्च१- बरं, आपल्या लोकांना विचारून घे एकदा, काय काय केलं ते त्यांनी, मला तर काही केल्याचं आठवत नाही.

राज्याधिपती- मी पाठवतो तुम्हाला यादी, त्यात काय आहे!

सर्वोच्च१- पाठवा, पण पुढच्या महिन्यापासून जरा जोरात भांडू या

सर्वोच्च२- नको हो बाबा, निवडणूक जाहीर होऊ द्या. सगळे मुद्दे आताच संपून जायला नकोत.

राज्याधिपती- (कौतुकानं) चांगला तयार होतोय हा..

सर्वोच्च१- (अधिकच कौतुकानं) हो ना, त्याला तुमचं भारी कौतुक आहे.

 ( सर्वोच्च १ च्या शेवटच्या वाक्याचा अर्थ नेमका काय असावा याचा विचार करत राज्याधिपती निरोप घेतात. राज्याधिपतींनी सर्वोच्च२ला चांगला तयार होतोय हा असं का म्हटलं असावं, या काळजीनं सर्वोच्च१ च्या मनावर बैठकीतून बाहेर पडताना ओरखडे उमटतात.)

********

तंबी दुराई

 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 30 Comments

 1. 🤣

 2. Tambi Durai yanchi tirkas tolebaji khupach sundar, lekh farach aavadla .

  1. वाह..टोलेबाजीला दाद दिल्याबद्दल आभार

 3. एकदम मस्त.

  1. धन्यवाद. तुमची दाद मोलाची

 4. तंंबी,
  चुरचुरीत लेखन नगरीचे निर्विवाद सम्राट।

  1. निर्विवाद आभार

 5. सुंदरच…हा लेख कुठेही छापला व खाली नांव नसले तरी जाणकार वाचक बराेबर आेळखणार… हे तंबीच असू शकतात… मजा आली..!!

  1. आभारी आहे

 6. मस्त !!

  1. धन्यवाद

 7. खूप छान लिहिले आहे. मनमुराद हसले मी. वाईट एवढेच वाटते की आपल्या पोळीवर तुप ओतताना जनतेच्या हातात पोळी शिल्लक नाही हे लक्षातच घेत नाही हे दुर्दैव 😢

  1. आभारी आहे.

 8. Solid लेख

  1. धन्यवाद सतीशजी

 9. हा हा हा…धम्माल!

  1. धन्यवाद बूकवर्म

 10. सुंदर ! हे बोलके शंख आहेत.

  1. बोलके शंख? आणि एकमेकांच्या नावानेही शंखच करतात. धन्यवाद