जुलै महिना पुनश्च साठी एकदम उत्सवगर्दीचा ( eventful ) गेला. १४ जुलैला सकाळी आणि संध्याकाळी ठाण्यात योजलेली पुनश्च मित्र गाठभेट आम्हाला आता वर्षभर पुरेल इतकं टॉनिक देऊन गेली. मैत्रीचे एक नवीन पर्व त्या दिवसापासून सुरु झाले. त्या दिवसानंतर बघाल तर पुनश्च च्या सदस्य संख्येत झपाट्याने भर पडायला लागली आहे. पुनश्च मित्रांनी पुनश्च साठी काही करण्याची तयारी दाखवली. मग आम्ही सुचवल्याप्रमाणे काहींनी त्यांच्या २०० परिचितांना whats app मेसेज करून पुनश्च चे सभासद होण्यास निमंत्रित केले. काहींनी त्यांच्या आवाजात पुनश्चमधील लेख/कथा ध्वनिमुद्रित करून पाठवल्या. आपल्याला काहीच दिवसात पुनश्चवर लेख ‘ऐकण्याची’ सोय करायची आहे, ते यामुळे सोपे होईल.  active वाचकांचा( म्हणजे जे वाचक एका आठवड्यात साईटवर नक्की येतात )  आकडा मला कळत असतो; त्यात लक्षणीय वाढ होते आहे. लेखांना रोज जे views मिळतात त्यात पण मोठी वाढ झालीये. आणि वाचक  साईटवर किंवा app मध्ये नुसतेच लेख उघडून बघत नाहीयेत तर त्यावर व्यक्तही होत आहेत, तेही मोठ्या संख्येने. गेल्या महिन्यापर्यंत महिनाभरात मिळून कमेंट्स ची संख्या २०० हून कमी असायची ती जुलै महिन्यात ४०० च्या वर म्हणजे दुपटीवर गेली. त्यामुळे त्यातून विजेती प्रतिक्रिया निवडणे हे एक हवेहवेसे आव्हान होऊन बसले.  या महिन्याची विजेती प्रतिक्रिया मीनल ओगले यांची आहे. मीनल जी, तुमचे अभिनंदन. अशाच लिहित्या राहा…

हे सर्व आपल्या सक्रीय सहभागामुळेच शक्य होतंय. एवढ्यात धन्यवाद देणार नाही कारण ही  फक्त सुरुवात आहे. तुमच्याकडून अजून भरपूर मदत मिळवायची आहे, आणि तुम्ही ती कराल याची खात्री आहे. फक्त 23 पुनश्च मित्र भेटीला आले तर एवढं सगळं घडतंय, विचार करा की पुढच्या भेटीला २३०  आले तर? या सर्वातून स्फूर्ती घेऊन आपण पुण्याला एक पुनश्च मित्र गाठभेट आयोजित करतोय. तारीख सध्या १९ ऑगस्ट ठरवतोय कारण श्रीकांत बोजेवार सरांना आणि प्रदीप लोखंडे ( भारताचे पोस्टकार्ड man , यांचे ‘प्रदीप लोखंडे, पुणे, 13’ हे पुस्तक वाचले नसेल तर जरूर वाचा. त्यांना या भेटीला यायचं आहे. ) यांना ती तारीख सोयीची आहे. आपल्यापैकी किती जणांना उपस्थित राहता येईल ते मला whats app मेसेज करून नक्की कळवा. भेटीची वेळ सकाळ की संध्याकाळ ( की ठाण्यासारखी दोन्ही 🙂 ) हे मिळणाऱ्या प्रतिसादावर ठरवू.

अशीच गाठभेट डोंबिवली आणि नाशिक येथेही करण्याचे मनात आहे. जसं ठरेल तसं कळवूच…

गेल्या महिन्यात काही चांगल्या उपक्रमांना देखील आपण सुरुवात केली आहे. त्यातील एक आहे पुनश्च वापर टीप. वाचकांना app वापरताना काही अडचणी येतात, त्या संबंधीचे मार्गदर्शन आपण या टिप्स मधून करतोय. बरोबर एक व्हिडीओ पण देतो जेणेकरून समजणे एकदम सोपे व्हावे. तुम्ही अजून केले नसेल तर youtube वर ‘पुनश्च’ हे channel subscribe करा आणि त्यावर हे व्हिडीओ पहा. सर्व व्हिडीओ एकत्र राहावेत म्हणून ही youtube channel ची सोय केली आहे. ही पुनश्च वापर टीप आपण दर शुक्रवारी  देतो. जुलै महिन्यापासून आपण अजून एक गोष्ट करायला सुरुवात केली. आपल्या सभासदांपैकी कोणी काही साहित्यिक/सांस्कृतिक/सामाजिक उपक्रम करीत असेल तर त्यांच्याकडून त्याबद्दल १० ओळी लिहून घेऊन त्या whatsapp मेसेज द्वारे पुनश्चच्या वाचकांपर्यंत पोचवतो. समाजातला चांगुलपणा एकमेकांना जोडण्याचा,चांगुलपणाचे एक नेटवर्क बनवण्याचा हा प्रयत्न आहे. याच धर्तीवर आपल्या app/site वर एक विभाग आणण्याचे मनात आहे ज्यात आपण फक्त साहित्यिक कार्यक्रमांची माहिती देऊ. त्यातून आपल्या जवळ एखादा कार्यक्रम झाला आणि आपल्याला कळलंच नाही ही बोच राहणार नाही. या सगळ्याबाबत तुम्हा सगळ्यांचे काय मत आहे हे जाणून घ्यायला मला आवडेल.

थोडं गेल्या महिन्यातील लेखांबद्दल. अपेक्षेप्रमाणे माझा ‘मेतकुट जमलं !’ आणि  भानू काळे यांचा वाचनसंस्कृती वरील लेख हे वाचकांनी खूप उचलून धरले. खूप प्रतिक्रिया आल्या या दोन्ही लेखांवर. पण अपेक्षेहून जास्त प्रतिसाद मिळाला उदय कर्वे यांच्या ‘अर्थकारण’ सदरातील लेखाला. व्यूज कमी असूनही त्याला प्रतिक्रिया मात्र खूप आहेत. याचा अर्थ आम्ही असा घेऊ का की तुम्हाला ‘अर्थविषयक’ लेख अजून वाचायला आवडतील? नक्की कळवा…इंजिनियरिंग वरील लेखाला अनपेक्षित सर्वात जास्त व्यूज मिळाले. त्याखालोखाल व्यूज मिळाले फुल्याफुल्यांचे पुस्तक या अवांतर सदरातील लेखाला. आणि अपेक्षाभंग झाला ‘तपश्चर्येचे पाप’ या पुरुषार्थ मासिकातील लेखाचे व्यूज आणि प्रतिक्रियांची संख्या बघून… आजच्या काळाला अनुरूप यासारखा दुसरा कुठला लेख शोधून सापडणार नाही. समाजातलं दुहीच राजकारण काही आजचे नाही. १९२७ साली म्हणजे पारतंत्र्यात असतानादेखील ते सुरूच होते. तेव्हा लिहिलेला हा लेख आपल्या सगळ्यांनाच एक वेगळीच दृष्टी देणारा ठरेल. अर्थात वाचला तर…आम्ही मुद्दाम तो शिफारस सदरात आणून ठेवलाय. जे computer वर वाचतात त्यांना तो सहज उपलब्ध होईल. वाचा आणि तुमचं त्यावरचं मत नक्की सांगा.

बाकी या महिन्यात सुद्धा आपण दर खेपेप्रमाणे वाचकांसाठी उत्तमात उत्तम लेख आणले आहेत. असे लेख जे या महिन्यातील काही घटनांना अनुरूप आहेत. उदा. स्वातंत्र्यदिनानिमित्त न. वि. गाडगीळ यांचा ‘पारतंत्र्यातील शेवटची रात्र’ हा 14 ऑगस्ट च्या रात्रीचे वर्णन करणारा लेख ‘अनुभवकथन’ या सदराखाली घेतला आहे. त्याशिवाय ६ आणि ८ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकून एका वेगळ्याच पर्वाची सुरुवात केली. त्या घटनेचे वर्णन करणारा, अक्षरक्षः अंगावर काटा आणणारा लेख ‘विज्ञानयुग’ अंकातून आपण घेतलाय. आचार्य विनोबा भावे यांचा ‘दे इझम पासून मुक्ती’ हा लेख तर चुकवू नये असाच. अर्थात असं प्रत्येक लेखाबद्दल म्हणता येईल. पुनश्च ची हीच तर खासियत आहे, नाही का?

तुमच्या प्रतिक्रिया, सूचनांचे स्वागत आहे. १९ ऑगस्ट ला पुण्यात नक्की भेटू…

 

Leave a Reply

This Post Has 12 Comments

 1. चांगला उपक्रम। अभिनंदन आणि धन्यवाद!

 2. चांगला उपक्रम

 3. Lovely, thanks..am Captain Kesari of Indian Navy

 4. अप्रतिम उपक्रम

 5. सुंदर उपक्रम

 6. Excellent August editorial…

 7. 19 तारखेच्या पुण्यातील बैठकीला मी ंंनक्की असेन !

 8. Where do we meet in Pune ?

 9. ५ ॲIगस्ट पासून महिनाभर मी पुण्यात आहे तेव्हा १९ ला पुन्हा जुन्या , नव्या पुनश्च मित्रांना भेटायला आवडेल . वेळ कोणतीही चालेल

 10. 19 तारखेच्या कार्यक्रमाचा तपशील क्रूपया कळवावा . ठिकाण, वेळ ,वर्गणी इ.

  1. वेळ हीच वर्गणी…:-) ठिकाण whatsapp वर कळवतो…