|| श्री नवभागवतपुराणम् ||

|आता श्रोतेहो धरा ध्यान | आणा आपुले इकडे कान |

हरपू नका देऊ निज भान | श्रवण करा वदेन ते ||

उलटल्या सप्ताही खास |  सुप्रसिध्द हस्तिनापुरास |

जिथे खाशा स्वाऱ्या करी वास  | नवल काही वर्तले ||

रेशीमबागेतील चालक | अवघ्या सरसंघाचे मालक |

कमळभ्रमरांचे पालक | मोह न ज्यांना काही असे ||

जैसे पुराणांमाजी भागवत | पराक्रमींमाजी देवव्रत  |

व्रतांमाजि नारायण व्रत | तैसे पुरुषांमाजि हे असे ||

ते म्हणिति ती पूर्व दिशा | ते म्हणिति ती दिन-निशा |

ते म्हणिति ती सीमारेषा | ऐसी त्यांची ख्याती असे ||

ते स्वयंचि एक विचार | ते स्वयंचि एक आचार |

ते स्वयंचि कुलाचार | सर्वकाही तेच असे ||

भारतदेशीचे भवितव्य | भारतीयांचे गंतव्य |

आणिक सांगण्या कर्तव्य | येऊन गेले सत्वरी ||

संघ काय करो जाणे | संघ काय धरो जाणे |

संघ काय स्मरो जाणे | भागवते वदिले तेथ ||

मोहने मोहिले जनांसी | मोहने मोहिले मनांसी |

मोहने संभ्रमिले अनेकांसी | ऐसी केली भाषणे ||

आता श्रोतेहो  सावधान | उलटू या पुढचे पान |

जे वाढवेल अपुलि जाण | राज-काज कारणे ||

संघ नव्हे हो नियंत्रक  | संघ नव्हे हो नियामक |

संघादेश हा भ्रामक | विचार ऐसा मांडिला ||

भाजपाशी आम्हा नसे देणे | सत्तेशी नसे घेणे |

आम्ही केवळ समाजकारणे | ऐसी टेप लाविली ||

मग त्यांनी फाडिली छाती  | उजळविल्या धर्मज्योति |

बघा अंतरी नांदते युती  | सर्वधर्मसमभावांची ||

जो असे हिंदू तो हिंदू  | जो नसे हिंदू तोही हिंदू |

असा चमत्कारी एक धंदू  | नवा तयांनी शोधला ||

 

मी काल वदलो काय | मी आज वदतो काय |

सगळे दिगंतरा जाय  | ऐसा का भागवती कावा? ||

कॉंग्रेसनामाचा गजर  | काँग्रेसस्तुतीचा निर्झर |

ऐकून साचे सगळे हजर  | झाले बहु स्तंभित ||

मोदी नामे सेवक | शहा नावे उपसेवक |

समस्त उरले भाविक  | व्यर्थ ठरविले भागवते ||

मग आले बंच ऑफ थॉट | आश्चर्ये सर्व वदले व्हाट? |

अनेकांची सुटली नॉट | पुढचे वचन ऐकोनी ||

कालबाह्य  गुरुजी झाले  | हे आता कळोसी आले |

‘विचारधन’ रुपयासम आले  | काळासंगे तळाला ||

सूचनेला विचार नको | आदेशाला नकार नको |

बदलाला होकार नको | ही तर होती संघनीती ||

भागवता काय झाले?  | ऐसे का बरळ बोलले? |

हे तर ‘घोळ’वलकर झाले |  कुजबूज आली कानी ||

मी ऐसे बोललोचि नाही | तुम्ही अर्थ काढिला काही |

आपुली सरसावूनि बाही  | त्यांनी आता म्हणो नये ||

मोहना वा मनमोहना | कुणास अर्पावे मना |

गोंधळल्या हिंदू जना  | प्रश्न आता पडो नये ||

|इति श्री नवभागवतपुराणम्  |

तंबी दुराई

**********

व्यंगचित्र सौजन्य – आलोक निरंतर व सतीश आचार्य 

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 13 Comments

  1. I am not a sanghi but it seems that tambi durai is paid person. Ask him to write similar document about congress, Rahul gandhi, bhujabal or sonia Gandhi. It seems that this is one sided. why not write something about keral floods and sangh. or Viveknand Rock memorial was erected by SANGH. andhra floods,MORVI floods, Killari earth Quake everywhere SANGH had came to help. What ever may be their thoughts, but I have a great respect for them.

  2. आवडेश…

  3. मिस्कील, मस्त लेख.

  4. Congratulations Srikantji for a very creative and satirical language and the article theme.

  5. झकास!!

  6. हाहा ! तंबी दुराई म्हणजे “चीत भी मेरी और पट भी मेरी” असं झालं आहे .
    यांच्या मनासारखं बोललं नाही तर “गरळ” नाहीतर “बरळ”. मज्जा आहे बुवा !

  7. नवभागवत पुराण एक निव्वळ निर्मल मिष्किली.या आधी देखील लेखकांनी भल्या भल्या मान्यवरांना नर्म चिमटे काढले आहेतच की.तेंव्हा द्वेषपूर्ण अस काही यात दि ल नाही विचारातल्या विसंगती वर फक्त बोट ठेवलय.

  8. खुसखुशीत,
    उपहासगर्भ …
    सणसणीत !

  9. छान! पण सध्याच्या “नमो नमः” च्या काळात किती जणांना हे रुचेल सांगता येत नाही. आपल्या वाचकांमध्ये “नमोरुग्ण” फारसे नसावेत.
    पण तरीही असे लेख प्रसिद्ध करत राहा!
    Lot of people would appreciate this silently…

  10. निव्वळ द्वेषपूर्ण