डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो अनुयायांसह केलेले धर्मांतर ही महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना होती. या घटनेचे चौफेर प्रतिसाद तेव्हा उमटले होतेच आणि आजही उमटत आहेत. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत बाबासाहेबांनी धर्मांतराची पहिली घोषणा केली. माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसांकरिता आहे, असे सांगत त्यांनी या विषयावर दीर्घकाळ चिंतन केले व त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी  नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या सर्व काळात बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या  सहकाऱ्यांमध्ये भाऊराव गायकवाड हे एक प्रमुख नाव होते. धर्मांतरानंतर त्याबाबतची भूमिका स्पष्ट करणारा, ‘प्रबुद्ध भारत’ च्या आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांकांत लिहिलेला हा लेख आहे.  पुनश्र्चच्या पुढील वर्षाच्या वाटचालीत धर्मांतराच्या विविध पैलूंवर त्या काळात वृत्तपत्र-मासिकांमधून प्रसिद्ध झालेले लेख सदस्यांना देण्याचा मानस आहे व त्या दिशेने तयारी सुरु आहे. तूर्तास भाऊराव यांचा हा लेख आज देत आहोत.

बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले भाऊराव उर्फ दादासाहेब हे नासिकच्या ‘ज्ञानविकास केंद्र’ ह्या शिक्षणसंस्थेचे तसेच नागपूरच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते सदस्यही होते. प्रबुद्ध भारत ह्या साप्ताहिकाच्या संपादक मंडळाचेही ते अध्यक्ष होते. ते मुंबई राज्याच्या विधानसभेचे आणि नंतर स्वतंत्र भारतात लोकसभेचेही सदस्य होते.

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 8 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  6. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  7. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  8. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..