विदर्भातील ज्या नेत्यांना राज्यव्यापी मान्यता मिळाली त्यात लोकनायक बापूजी अणे हे प्रमुख नाव.  सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वर्तुळातील ते अधिकारी व्यक्ती होते. अणे यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० रोजी झाला. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून १९०२ साली ते बी. ए. झाले. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठातून ते एल. एलबी झाले. लोकमान्य टिळकांना आपले गुरु मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच त्यांना ‘विदर्भाचे लोकनायक’  या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे काँग्रेसमध्ये त्यांचे मतभेद झाले.
इंग्रज राजवटीत व्हॉईसरॉयच्या सल्लागार मंडळाचे सल्लागार, सिलोनमध्ये भारताचे हायकमिशनर आणि  पुढे स्वतंत्र भारतात बिहारचे राज्यपाल अशी पदे त्यांनी भूषविली. प्राच्यवाङ्मयाचा त्यांचा व्यासंग  होता. तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म आणि साहित्य हे त्यांचे चिंतनाचे विषय होते.  टिळकांच्या जीवनावर आधारित त्रिखंडात्मक श्लोकबद्ध संस्कृत काव्य त्यांनी रचले. १९२८ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.  २६ जानेवारी १९६८ साली त्यांचे निधन झाले.
१९८० साली अणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘वसंत’ मध्ये आलेला हा वीणा बाळशास्त्री हरदास याचा लेख. ते लोकनायक म्हणून कसे होते आणि मायाळू आप्त म्हणून कसे होते या दोन्हीचे मनोज्ञ दर्शन या लेखातून घडते-

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..