बंडखोरी कोणत्या काळात केली जाते याला मोठे महत्व आहे. १९२० साली स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती या कल्पना युरोपातसुध्दा रूळल्या नव्हत्या अशा काळात गीता साने या एका वैदर्भीय मराठी विदुषीने महाराष्ट्रात स्त्री स्वातंत्र्याचा हुंकार उमटवला हे धाडस आजही तेवढेच मोठे आणि मोलाचे वाटते. एका बाजूला समाजातून स्त्रीला शिक्षण, नोकरी, कर्तृत्व या बाबतीत आज सर्व स्वातंत्र्य मिळते आहे. त्याचवेळी करवा चौथपासून तर अमूक मालिकेतील नायिकेने घातल्याप्रमाणे मंगळसूत्र घालण्याची ऐच्छिक गुलामीही स्त्रिया आनंदाने स्वीकारत आहेत. विवाहानंतर स्त्रीने नाव,आडनाव बदलू नये असा आग्रह  गीता साने यांनी शंभर वर्षांपूर्वी धरला होता, तो आजही फार मान्य झालेला दिसत नाही. वैचारिक लेखन, कथालेखन करणाऱ्या आणि विवाहास निग्रहाने नकार देणाऱ्या गीता साने यांनी स्त्री मासिकाच्या १९३६ सालच्या अंकात लिहिलेला हा लेख आजही ‘बंडखोरी’ वाटावा, हे काही आपल्याला भूषणावह नाही.

**********

सदर लेख संरक्षित असून, तो पूर्ण वाचण्यासाठी सभासदत्व घेणे अनिवार्य आहे. पुनश्चच्या साईटवर आजच ऑनलाइन रजिस्टर व्हा! आपण जर सभासद असाल तर आपला युजरनेम-पासवर्ड वापरून लॉगिन करा

Leave a Reply

This Post Has 5 Comments

  1. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  2. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  3. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  4. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..

  5. सशुल्क लेखावरील प्रतिक्रिया वाचण्यासाठी सभासद असणे अनिवार्य आहे..