लेखक: तंबी दुराई

भकासवाणी सादर करत आहे, ‘नीतरामायण’ अर्थात नेहमींच चालणारे रामायण. आकाशवाणीसाठी मूळ गीतरामायण लिहिणारे आधुनिक वाल्मिकी, अर्थात आपले गदिमा आणि ते सादर करणारे बाबुजी यांच्या जन्मशताब्दीस्मृतीला वंदन करुन आणि येत्या निवडणुकांना स्मरुन सादर आहे नीतरामायण-

********

खळाळता जनसागर समोर होता. आलेले, आणले गेलेले यांची तौबा गर्दी झाली होती. पुन्हा एकदा निवडणुका आल्या होत्या. युती होणार की नाही, युती करणार की नाही, असे प्रश्न हवेत घिरट्या घालत होते. या प्रश्नांच्या उत्तरांना यशस्वीरित्या बगल देत सम्रांटांची सावली चतुरपणे बाह्या सरसावत होती. खूप काही बोलूनही काहीच बोलायचे नाही, आवाज वाढवूनही तो किती डेसीबलचा आहे याचा कुणाला थांगपत्ता लागू द्यायचा नाही, याचा सतत केलेला सराव त्यांच्या भाषणातून क्षणोक्षणी प्रतीत होत होता. समोरचा अथांग जनसागर पुन्हा एकदा तेच भाषण ऐकून पावन झाला होता…

 

स्वये श्रीराजपुत्र ऐकती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

 

सुमार सारे विविध वयाचे

निर्गुण पुतळे स्वयंहिताचे

मूढ सांगती चरित मूढाचे

वाटीने लोट्याची आरती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

 

तापट मुद्रा, आव ध्वनीचे

गंधर्वच ते रंगभूमीचे

चतुराईने भाव मनीचे

आपुल्या अंतरी ते दडवती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

 

ते प्रतिभेच्या आम्ल मनातील

विगत वैभव गाते कोकीळ

तार स्वरांनी करूनि किलबिल

भाषणे बहुबाता मारिती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

 

फुलांपरी ते देठ विहरती

अस्पष्टसे स्वर भुवनी झुलती

कर्णदुषणे सुंदर डुलती

संगती सारे डरकाळीती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

 

सात जणांच्या भाषणांमधूनि

नऊ जणांच्या नऊ स्वरधुनि

स्टेजवरती आल्या उतरूनि

संगमी श्रोतेजण गोंधळती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

 

पुरूषार्थाची साधी चौकट

त्यात पाहत निज जीवनपट

प्रत्यक्षाहूनि प्रतिमा किचकट

प्रभू रे, किती जण चक्रावती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

 

जाम बोर ते काय बोलती

शब्दांमागुनि शब्द चालती

सचिव, मंत्रिगण, स्त्रीया डोलती

लाळ ती ओठी ओघळती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

 

संपून भाषण वळले सत्वर

वळूनि कवळती अपुले शैशव

पुत्रभेटीचा घडे महोत्सव

आणि तो सगळ्यांनाच माहिती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

स्वये श्रीराजपुत्र ऐकती

त्याचे बाबा रडगाणे गाती…

********

त्याचवेळी तिकडे दूर नागपुरात लाठ्यांचे खेळ, शस्त्राची पूजा, कवायती सुरू होत्या. युध्दाची जय्यत तयारी सुरू होती. भल्याभल्यांचे कान आणि डोळे तिकडे लागले होते. काय हुकम होतो, काय आदेश येतो आणि कुठली दिशा सांगितली जाते..

दैवजात दुःखे वत्सा

दोष ना कुणाचा

पराधिन आहे जगती

अध्यक्ष भाजपाचा

दोष ना कुणाचा…

********

नागपुराच्याच परिसरातील ग्रामीण वनक्षेत्रात जाऊन आपले दुःख लपविण्याचा प्रयत्न करत असलेले कनिष्ट बंधूही त्याचवेळी त्या वनांतील एका निष्पर्ण वृक्षाच्या खोडाला धरून आपली व्यथा सांगत होते…

उगा का काळीज माझे उले

पाहुनि पार्कावरची फुले…

आज पुन्हा ते कळले अंतर

पेटूनि उठला बंधू सत्वर

आज का, अपुले वैभव सले

पाहुनि पार्कावरची फुले…

****

[अपूर्ण आणि उर्वरित रचना पूर्ण करण्याचे काम सुरू असून जसजशा निवडणुका जवळ येतील तसे हे नीतरामायण आणखी पुढे पुढे जात राहील. अखेर जेंव्हा केव्हा मंदिर बांधून पूर्ण होईल (तसे झाले तर राजकीय अजेंडाच संपेल त्यामुळे…) तेंव्हाच हे नीतरामायणही पूर्णत्वाला जाईल याची नोंद घ्यावी ]

पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक सरस, आणि विविध विषयांना वाहिलेले लेख आपण पुनश्चवर प्रसिद्ध करतो आणि करतच रहाणार आहोत. तुम्ही सशुल्क सभासद झालात तर हे सर्व लेखही तुम्हाला सहज वाचता येतील. तेही किती स्वस्त! केवळ एक रुपयात एक दर्जेदार लेख!

एक वर्षभराचे फक्त १०० रुपये भरा आणि वाचा १०४ सशुल्क लेख.

मग वाट कशाची पहाताय? ह्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच सभासद व्हा

Leave a Reply

This Post Has 10 Comments

 1. सुंदर

 2. अप्रतिम… डबल सेंच्युरी मारलीत….

 3. अपूर्ण काव्य पूर्ण व्हायची वाट पहातोय तरीही प्रथम सर्ग एकदम झकास उतरलाय . कविवर्य सांभाळा शिरस्त्राण चढवा , सैनिक निराळ्या अर्थाने ‘ पेटून ‘ निघतील .

 4. BEKKAR. TAMBI DURAI , ARE YOU PAID ? i AM A COMMON MAN. NOT FROM ANY PARTY OD ISAM. BUT WHAT I FOUND THAT THIS SEEMS TO BE ONE SIDED. LIKE A HORSE WITH EYE COVERS CAN SEE ONLY IN ONE DIRECTION, YOU ARE HARPING ON ONE SIDE. LET US HAVE FUN WITH OTHER PARTY LEADERS ALSO.

  1. let other side be in power and i will have fun with them too. Please read my articles when UPA was in power.

 5. नकोस जनते परत फिरू ग, नकोस जनते दु:ख करू
  अनुशासन पर्व म्हणणा-यांचा, नको उगा मनि तू राग धरू

  ही दैवाची उलटी रेघ
  तव बुद्धीचा करिती भेद
  भाग्य आपुले आपुल्या हाते नकोस आता दूर करू

  हा श्री छद्माचा अवतार
  विवेक तुझा झाकळवितो फार
  तारक नव्हे हा मारक तूझा, नको भरवसा धरू

  देशी असो वा ‘विदेशी वाण’
  लाळ घोटणे यांचे काम
  भले बुरे ते तूच जाणिशी
  छद्मींचा या धरूनि भरोसा नको उगा तू राग धरू

  नटरंगी हे विकले जाती
  देशहिताची ना त्यां काही क्षिती
  शुक्राचार्य हे त्या झारीतिल
  हाती आले त्या झोडपणे, तू शकशिल काय करू?

  माध्यमप्रेमी हे कुबुद्धी सारे
  परपोषित ही बांडगुळं ना गे
  देशहिताची चाड न ह्याना
  अनुल्लेखिता हे नष्टचि होतिल, नको उगा तगमग करू

  शेवटी ग दी मांच्या शब्दात:

  पावन गंगा, पावन राम
  श्रीरामांचे पावन नाम
  त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभू, नाविक आम्ही नित्य स्मरू

 6. वाह!!! अति सुंदर

 7. वा…वा..आवडलंय. पुढच्या रचनांची उत्सुकता लागून राहिली आहे.

 8. हा हा हा

 9. हा हा, आता तंबी दुराईच्या प्रतिभेला खाद्य पुरवणारा मोसम सुरू झाला आहे. पुढील वर्षभर या नीत रामायणाचे भरपूर अध्याय रचले जातील असे वाटते.