सध्याच्या पुनश्च च्या सभासदत्वाचे काय होणार?

आपण पुनश्च चे जे सभासदत्व घेतले आहे ते कायम राहणार. उदा. तुम्ही जुलै महिन्यात १ तारखेला पुनश्च चे सभासदत्व घेतले असेल तर ते ३० जून २०१९ पर्यंत सुरु राहणार आहेच. म्हणजे हे सभासदत्व ३६५ दिवसांचे आहे. पुनश्च चे app आणि website दोन्ही काही महिने सुरु राहील. वाचकांच्या कलाने आणि सोयीने हळूहळू त्यांना बहुविध वर घेतले जाईल.

पुनश्च चे सभासदत्व बहुविध शी जोडणार कसे?

पुनश्च च्या सर्व सभासदांचा data बहूविध वर घेण्याचे काम सुरु आहे. ते एकदा झाले की पुनश्च चेच username/password वापरून तुम्ही बहूविध वर login करू शकता. आणि पुनश्च या कॅटेगरीचे लेख वाचू शकता.

किंवा पुनश्च चे सभासदत्व संपले की बहुविध वर येऊन तिथे पुनश्च चे सभासदत्व नुतनीकरण करा. त्यानंतर मग तुम्ही निरंतर बहुविध साईट/app वरूनच पुनश्च चे लेख वाचू शकाल. महात्वाची गोष्ट…या सगळ्या स्थित्यंतरात आम्ही सगळे तुमच्या मदतीला असणार आहोतच. त्यामुळे काळजी नसावी 🙂

बहुविध चे पण app येणार का?

सध्या बहुविध ची website तयार झाली आहे. अर्थात त्यातही अजून भरपूर सुधारणेला वाव आहे. आता बहुविध च्या android app वर काम सुरु आहे. ८-१० दिवसात ते हाती येईल. ते एकदा ठीक वाटलं, त्यात प्राथमिक सुधारणा झाल्या की ios app पण मिळेल. हा झाला पहिला टप्पा. असे सुधारणांचे तीन टप्पे आपण पार करणार आहोत.

पुनश्च आणि बहुविध यात फरक काय?

पुनश्च ही एक कॅटेगरी आहे जी किरण भिडे, सुधन्वा कुलकर्णी आणि श्रीकांत बोजेवार मिळून चालवतात. पुनश्च चेच एक भावंड म्हणता येईल अशी कॅटेगरी आहे, दीर्घा. यात पुनश्च मध्ये घेता येणार नाहीत असे ४००० शब्दांच्या वरचे ( सध्यातरी जुन्या अंकांमधले ) निवडक लेख आपण या कॅटेगरीत देणार आहोत. ही कॅटेगरी देखील पुनश्च चीच टीम चालवणार आहे. या दोन कॅटेगरीत साधारण जुने पण कालसुसंगत लेख हाच विषय असणार आहे. पण हा विषय सोडल्यास अनेक विषय आहेत ज्यात अनेकांना रस असू शकतो. त्यांच्यासाठी इतरही विषय या बहुविध.कॉम वर असतील. म्हणजे पुनश्च हे साहित्याचे एक दुकान असेल तर बहुविध हे साहित्याचे mall आहे. यात पुनश्च प्रमाणे इतर नियतकालिके असतील जी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ चालवतील. वाचकांना आपल्या आवडीनुसार नियतकालिके निवडता येतील आणि त्याचे पैसे एकत्र भरता येतील. नंतरही एखादी कॅटेगरी विकत घ्यावीशी वाटली तरी घेता येईल. त्याचे सभासदत्व तेवढे दिवस पुढे चालेल.

सध्याच्या पुनश्च च्या सभासदांनी काय करावे?

ज्या सभासदांचे सभासदत्व डिसेंबर अखेर संपणार आहे त्यांनी बहुविध.कॉम वर जाऊन नवीन शुल्क भरून पुनश्च चे सभासदत्व घ्यावे. आपण या वर्षीपासून पुनश्च चे नुतनीकरण शुल्क वार्षिक २०० रुपये केले आहे. यात आपल्याला तीन विशेष अंक आम्ही देणार आहोत. नवीनच सभासदत्व घेणाऱ्या सभासदांना २५० रुपये शुल्क आहे. पुनश्च च्या सद्य सभासदांनी punashchamitra हा discount code इथूनच copy करून टाकावा म्हणजे त्यांना २०० रुपयेच शुल्क लागेल.

ज्यांचे सभासदत्व पुढील वर्षीचे आहे त्यांनी आमच्या निरोपाची वाट पहावी. जर का पुनश्च चा data बहुविध वर नेता आला तर प्रश्नच मिटला, नाहीतर ज्यादिवशी ते संपेल त्यानंतर कधीही बहुविध च्या website किंवा app वरून नुतनीकरणाचे पैसे भरून पुनश्च चे सभासदत्व घ्यायचे. अशा सभासदांनी बहुविध वरील इतर कॅटेगरी घ्यायच्या असतील तर ते घेऊ शकतात. पुन्हा एकदा आम्ही इथे सांगू इच्छितो की आम्ही फक्त एक फोन call किंवा एक whatsapp मेसेज दूर असणार आहोत. आम्हाला अडचण सांगा म्हणजे आपण ती दूर करू.

याखेरीज इतरही काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आम्हाला उत्तरं देण्यात आनंदच आहे.

Leave a Reply

This Post Has 2 Comments

 1. धन्यवाद!
  माझे सभासदत्व कधी संपते हे माहीत नाही.सभासद झाल्याची तारीख स्मरणात नाही.
  अशा माझ्यासारख्या इतरांनाही जर नूतनीकरण कधी करायचे या बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती
  कौस्तुभ ताम्हनकर

 2. धन्यवाद!
  माझे सभासदत्व कधी संपते हे माहीत नाही.सभासद झाल्याची तारीख स्मरणात नाही.
  अशा माझ्यासारख्या इतरांनाही जर नूतनीकरण कधी करायचे या बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती