शाह पकोडा भंडार!

भारतीयांना खाण्यापिण्याचा मोठाच षौक आहे. ते चवीने खातात आणि चवीने पितात. त्यामुळेच गेली पाच वर्षे भारतीय राजकारणात चहाची चर्चा होती. परंतु भारतीयांना चहाच्या आधी पकोडे उर्फ भजी हवी असतात. शाह यांच्या कृपेने आता पकोडेही आलेले आहेत. तेव्हा ‘शाह पकोडा भंडारा’तील विविध पकोड्यांची ही ‘तोंड’ओळख!

नाथांघरचे दुखरे पत्र,दादांघरचे खुपरे उत्तर !

जळगावी नाथांघरी पेटलेल्या नाराजीच्या शेकोटीत मनःस्तापाची वांगी भाजली जात आहेत तर मालवणात दादांघरी माश्यांच्या कालवणाऐवजी ह्रदयाची कालवाकालव होऊ लागली आहे. त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे आमच्या हाती लागली आहेत-

तू आता 136 वर्षे निवांत झोप !

आधी होते माकड त्याचा झाला मानव...हा डार्विनचा सिद्धांत आपण मुकाट मान्य केला होता. पण भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्रिपदाचे ओझे झालेल्या सत्यपालसिंह यांना काही तो सिद्धांत पेलवला नाही. त्यांनी तो साफ नाकारला...आणि मग काय घडले...?

आणि सगळीकडे शांतता पसरली

उध्दवराव नुसते तळमळत होते. त्यांचा संपूर्ण उजवा पाय गेला आठवडाभर दुखत होता. रश्मी वहिनींची झोप उडाली होती कारण रात्रभर उद्धवरावांचे पायोपचाराचे प्रयोग सुरू होते. कधी ते पायाखाली उशी घेत, तर कधी उशीवर पाय घेत. कधी गरम पाण्याचा शेक घेत तर कधी बर्फाचा खडा रूमालात बांधून त्याने पाय शेकत. कधी गुडघ्याला क्रेप बँडेज बांधत तर कधी पोटरीला बँडेज बांधून घेत. हे सगळे अर्थातच रश्मी वहिनींच्या मदतीने सुरू होते, त्यामुळे त्यांचीही झोप होत नव्हती. गेल्या शनिवारी रात्री अचानक उद्धवरावांच्या उजव्या पायाची टाच दुखायला सुरूवात झाली आणि रात्रभरात टाचेतले दुखणे पोटरीपर्यंत आणि तिथून कंबरेपर्यंत पसरत गेले. रविवारी सकाळी तर त्यांना पाय उचलणेही कठीण झाले. या गोष्टीला आता आठवडा उलटून गेला होता पण पायाचं दुखणं काही कमी होत नव्हतं. उध्दवराव नुसते तळमळत होते. नाटकातल्या व्यक्तिरेखेनं रंमंचावर अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरावं तसे मिलिंद नार्वेकर हाताची घडी घालून फिरत होते.

पुनश्च तंबी दुराई

श्रीकांत बोजेवार हे नाव मराठी वाचकांसाठी परिचयाचे आहे. त्यांच्या लोकसत्तामध्ये शुक्रवारी येणाऱ्या चित्रपट परीक्षणावर पूर्वी आम्ही सिनेमा बघायचा की नाही ते ठरवायचो. आणि त्यांच्या तंबीने दोन फुल एक हाफ आणून दिल्याखेरीज आमचा रविवार जायचा नाही. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स असा प्रवास झाल्यावर तंबी जरा विश्रांतीसाठी थांबला होता. वर्षभराच्या रजेनंतर आता ताजातवाना होऊन तो  तुम्हा आम्हा वाचकांचं विनोदाचे निरनिराळे आविष्कार दाखवून प्रबोधन करण्यासाठी पुनश्च परतत आहे 'पुनश्च'च्या माध्यमातून. पुनश्चचा हेतूच मुळी अशा जबरदस्त लेखकांना नवीन माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवणे, वाचकांना अतिशय अल्प अशा मोबदल्यात उत्कृष्ट लेखन वाचायला मिळणे आणि हे सगळे करताना लेखकांना मान मिळतोच, धनही मिळवून देणे असा आहे.