इंग्रजांचं भीमा-कोरेगाव : भाग ६ आणि ७

मागच्या भागात आपण पाहिले हा स्तंभ कोणताही प्रचंड विजय साजरा करण्यासाठी नसून या लढाईत शूरतेने लढलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला होता जे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अडकलेले होते आणि तरीही त्यांनी शत्रुसैन्याशीं निकराचा सामना केला. पण धूर्त एल्फिन्स्टनने ह्या सगळ्यात एक अतिशय महत्त्वाची गडबड करून दुहीची बीजं पेरून ठेवली होती. त्याने नक्की काय केलं होतं हे पाहूयात आजच्या शेवटच्या ६ व्या  आणि ७ व्या भागांत.

पियुष आणि मँगोलाचे उद्गाते, काकासाहेब तांबे

मुंबईचे सुप्रसिद्ध ‘ तांबे-आरोग्यभुवन ’ आणि आता ‘ बी. तांबे लिमिटेड ’ ह्याचे संचालक श्री. काकासाहेब तांबे ह्यांना पाहताच अकबर इलाहाबादीचा हा शेर सहजच आठवतो:- ‘‘लोक कहते हैं, बदलता है जमाना सबको, मर्द वह है, जो जमाने को बदल देता है.’’ (लोक म्हणतात, काळ सर्वांनाच बदलतो, पण काळाला जो बदलतो तोच खरा पुरुष होय.) काकांनी राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाची कसलीही युगक्रांती केली नाही हे जरी खरे असले तरी बालपणापासून झगडत राहून अखेरीस त्यांनी आपल्याला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण केली हेही तितकेच खरे आहे. खरे पाहिले तर श्री. वा. वि. ऊर्फ काकासाहेब तांबे ह्यांनी इंजिनियर आणि शास्‍त्रज्ञ होण्याचा प्रयत्न केला पण आयुष्याची सुरुवात शिक्षकाच्या पेशाने करून शेवटी ते शिक्षक न राहता व्यापारी झाले, हा केवढा विरोधाभास आहे! आणि व्यापारीसुद्धा काही बडा नव्हे, ताकासारख्या वस्तूचा!