तिसरा पर्याय

मतिमंद नसलेली कोणतीही व्यक्ती सजग राहू शकते पण त्यासाठी मेंदूला प्रशिक्षण द्यावे लागते.सजग राहणे हे एक कौशल्य आहे,ते प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते.

भावनांची बुद्धी-भावनिक बुद्धी

लेखक: डॉ यश वेलणकर तन्मयने अकरावी,बारावीची दोन वर्षे आय आय टी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.तो गणितामध्ये अतिशय हुशार,पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा,त्यामुळे तो आय आय टी च्या प्रवेश परीक्षेत सहज यश मिळवील अशीच सर्वांची अपेक्षा होती.पण तसे झाले नाही.त्याला त्या परीक्षेत खूप कमी गुण मिळाले.रिझल्ट लागला त्याच रात्री त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला पण एका अपयशाने तन्मयने हे टोकाचे पाउल का उचलले असावे हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. निशिकांत अतिशय व्यवस्थित माणूस, झोपून उठल्यानंतर चादरीची घडी कशी करायची याचीही त्याची पद्धत ठरलेली आहे. तो स्वतः  रोज तशी घडी करतोच पण घरातील सर्वानी तसेच वागावे असा त्याचा आग्रह असतो.आता त्याचा मुलगा पौगंडावस्थेत आला आहे आणि तो थोडासा अव्यवस्थित आहे. निशिकान्तला त्याचे वागणे अजिबात सहन होत नाही.मुलाने त्याचे कपडे व्यवस्थित ठेवले नसले की निशिकान्तच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.बेभान होऊन तो काहीही बोलतो,मुलाला मारायला जातो.मुलगाही आता उलट उत्तरे देतो त्यामुळे त्यांच्या घरात सध्या अतिशय तणावाचे वातावरण असते.तन्मय आणि निशिकांत असे का वागतात ?

  • 1
  • 2