मे महिन्याचे संपादकीय

प्रतिक्रिया-स्पर्धेचा निकाल आणि आगामी महिन्यात काय वाचाल . . . नमस्कार. या महिन्यापासून एक नवीन प्रथा सुरु करतोय. येत्या महिन्यात कोणते लेख आपल्या भेटीला येणारेत त्याबद्दल मी थोडसं लिहून महिन्याच्या सुरुवातीला टाकाव असं ठरतंय. या निर्णयाची पार्श्वभूमी सांगतो.

नवीन वर्षात नवीन काय भाग १

नमस्कार. पुनश्च ची कल्पना आमचे मित्र आणि website/app या क्षेत्रातील माहीर विनय सामंत यांच्याकडे बोललो तेव्हा लगेच त्यांनी ती उचलून धरली कारण त्यांच्यामते पुनश्च हे मराठीतील पहिलेच सशुल्क डिजिटल नियतकालिक असणार होते. त्यानुसार ते 'पहिलेपण' पुनश्चने मिळवलं आणि मिरवलंदेखील. पहिल्या तीन महिन्यातच हजार downloads चा टप्पा गाठून पुनश्चने अनेकांचे अंदाज चुकवले. या वर्षाची सुरुवातदेखील पुनश्च अशीच जोरदार करीत आहे. मराठीत…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार, वाचकहो. हा हा म्हणता ३१ डिसेंबर झाला आणि १ तारीख उजाडली.  २०१७ साल संपलं आणि पुनश्च सुद्धा ३ महिन्याचं झालं. मराठी भाषेसाठी, साहित्यासाठी आणि पर्यायाने मराठी समाजासाठी काहीतरी करायचं बरेच दिवस मनात होतं. 'पुनश्च'च्या रूपाने ते यावर्षी साकार झाल्याचं समाधान आहे. या काळात आपण सशुल्कचे ३० आणि अवांतरचे ८१ असे मिळून १११ लेख प्रसारित केले. मला आशा आहे की सगळे जरी नाही तरी त्यातले बरेचसे तुम्ही वाचले असणार.. या तीन महिन्यात  मराठी साहित्याचे प्रकाशक, लेखक, श्याम जोशीसरांसारखे ग्रंथालय क्षेत्रातले दिग्गज अशा खूप साऱ्यांशी परिचय झाला. तुमच्यासारख्या हजारो सुजाण, चोखंदळ वाचकांच्या संपर्कात आलो. २०१७ साल या अर्थाने मला खूपच समृद्ध करून गेले.

दुसरे आवर्तन पूर्ण झाल्याच्या निमित्ताने

नमस्कार. कालच्या रविप्रकाश कुलकर्णींच्या लेखाबरोबर आपले #पुनश्च चे दुसरे आवर्तन पूर्ण झाले. म्हणजे आजवर आपण एकूण १६ लेख प्रसिद्ध केले. प्रत्येकाने मनातल्या मनात आपण यातले किती वाचले याचं गणित मांडलं असेलच. काश! मला तो आकडा समजता..:-) आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा १६ हा आकडा वाचकांच्या आवडीनिवडीचा अंदाज यायला कमी आहे. हा आकडा पुरेसा असता तर माझे हात एखादा वाचक सर्व्हे करण्यासाठी…

जरा इकडे लक्ष द्या. . .

#पुनश्च च्या ८ लेखांचे पहिले आवर्तन झाले. या पहिल्या आवर्तनात आपण अंतर्नाद मासिकातले दोन लेख; एक अनुभव आणि एक कथा, आरोग्यसंस्कार मासिकातले दोन लेख; एक कविता रसास्वाद आणि एक अर्थकारण याविषयावरचा, एक भवताल मासिकातला चिंतन या सदराखाली , एक कालनिर्णयचा मराठी भाषेसंदर्भातला  आणि एक विचित्रविश्व मधला व्यक्तिचित्रण करणारा असे मिळून ७ लेख पुनःप्रकाशित केले. ठरल्याप्रमाणे आठवा लेख  डॉ यश वेलणकरांचा…

कशी वाटत्ये सुरुवात?

नमस्कार, म्हटलं #पुनश्च ची सुरुवात कशी वाटत्ये विचारूया तरी सभासदांना. तीन लेख आत्तापर्यंत प्रकाशित झालेत. मला खूप उत्सुकता आहे की मी निवडून काढलेले लेख तुम्हाला कसे वाटत आहेत? त्यानिमित्ताने काही प्रश्न विचारतो तुम्हाला. बघा, उत्तरं पाठवलीत तर खूप आनंद होईल. वाचायला वेळ मिळाला? वेळ होता पण तांत्रिक अडचणींमुळे वाचता आला नाही असं झालं का? लेखाचं शीर्षक वाचूनच पुढे जायचं टाळलं…

पुनश्च : दुसरी घंटा

उद्या, म्हणजे ३० सप्टेंबरला, तीसरी घंटा वाजेल आणि  #पुनश्च या मराठीतल्या पहिल्याच डिजिटल नियतकालिकाचा पहिला प्रयोग म्हणजे पहिला सशुल्क लेख प्रसारित होईल. वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी हा एक मोठा भूमिकाबदल असेल. truecaller या app वर माझं प्रोफाईल तुम्ही बघितलंत तर डॉ. किरण भिडे असं दिसेल. माधवबागशी सबंधित असण्याचा परिणाम. कोणी ते प्रोफाईल बनवलं मलाही ठाऊक नाही, पण वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा तो…

लोकसत्तातील लेख

रविवार १७ सप्टेंबर रोजी लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख थोडा सुधारून परत देत आहे. पेपरवरून डिजिटल माध्यमात जाताना काय काय करू शकतो याचा एक अंदाज तुम्हाला येईल. ग्रंथसखाची लिंक , पहिला केसरी चा अंक आणि दर्पण, मुंबई अखबार ची एका पुस्तकातील माहिती देणारे फोटो टाकता आले. अजून तुमच्याही काही कल्पना असतील तर कळवा.