देऊळ

लेखाचं नाव वाचून तुमच्या पैकी काही जणांच्या मनात येईल,’’आता याने काय लिहिलंय या विषयावर?’ फारच संवेदनशील आणि लोकांच्या श्रद्धेला हात घालणारा विषय आहे. पण हल्ली आलेल्या याच विषयावरील चित्रपटाने ज्या चतुराईने हा विषय हाताळला त्याच चतुराईने  या विषयावर लिहिण्याचा माझा प्रयत्न राहील. मुळात तो चित्रपट बघितल्यापासूनच जरा अस्वस्थ व्हायला झाल होत. त्यातल्या दत्ताच्या देवळाच्या मार्केटिंगचे प्रकार बघितल्यावर तर माझ्यासारख्या त्याच…

दप्तरधारी

बर्‍याच दिवसांनी सकाळच्या चेंगराचेंगरीच्या वेळी रेल्वेने (लोकलने) प्रवास करण्याचा योग आला. दोन तीनदा स्लो प्लॅटफॉर्मवरून फास्ट प्लॅटफॉर्मवर आणि तिथून पुन्हा स्लो प्लॅटफॉर्मवर असा routine warm-up केल्यावर आणि २-३ गाड्यांच्या दरवाजाजवळ पोचण्याचा निष्फळ प्रयत्न केल्यावर चौथ्या गाडीत कसाबसा चढू शकलो. मी काय म्हणतोय याचा अंदाज ‘अशा‘ वेळी प्रवास करणार्‍यालाच येऊ शकतो. असो. आत चढल्यावर (खरं म्हणजे मागून ढकलून चढवल्यावर) तप करायला…

अमेरिकन व्हिसाचे मृगजळ

गेल्या ४ महिन्यांमध्ये या ना त्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचा योग आला. जानेवारीत डॉक्टरांच्या ट्रिपच्या निमित्ताने थायलंड झालं. फेब्रुवारीत सिंगापूर मलेशियातील काही व्यक्ती, ज्या आपलं क्लिनिक तिकडे उघडण्यासाठी interested आहेत त्यांना भेटायला गेलो. मार्च महिना लंडनमध्ये आपल्या तिकडच्या क्लिनिकच्या set-up मध्ये गेला. आत्ता एप्रिलमध्ये डॉ. रोहित सान्यांबरोबर जागतिक हृदयरोग परिषदेत पेपर मांडण्यासाठी दुबईला गेलो होतो. तुम्ही म्हणाल, काय मजा आहे…

स्टीव्ह, पुन्हा भेटू…

गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या माणसांच्या मरणाची साथच आल्यासारखी वाटते. श्रीनिवास खळे, गौतम राजाध्यक्ष, जगजित सिंग, स्टीव्ह जॉब्ज् सारखी दिग्गज प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व एकामागून एक काळाच्या पडद्याआड चालली आहेत. यांतील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात अक्षरश: बाप होता. प्रत्येक जण गेल्याची प्रत्येक प्रमुख वृत्तपत्राने पहिल्या पानावर बातमी दिली, पण एका माणसाची यात विशेष नोंद घ्यावी लागेल कारण तो माणूस भारतीय नव्हता तरीही भारतातल्या…

माजघरातील मंद समई

६ जानेवारी २०१३ ला पहाटे आई साने गेल्या म्हणजे लौकिकार्थाने आपल्या सर्वांना सोडून पंचतत्त्वात विलीन झाल्या. डॉ. रोहित सानेंच्या आई या नात्याने,  सगळ्या साने केअर कुटुंबाच्या त्या आईच होत्या. बाबा साने (डॉ. माधव साने) २००४ मध्येच आपल्याला सोडून गेलेले, आता आई ही गेल्या. अक्षरक्ष: साने केअर कुटुंबाला पोरकं करून गेल्या. खरं तर, वहिनीचं म्हणजे माझ्या भावाच्या बायकोचं माहेर, एवढ्या जवळ…