महाग की स्वस्त?

गेल्या आठवड्यात मेतकूटमधे आलेल्या काही जणांनी पदार्थाचे दर जास्त वाटतात अशी तक्रार केली. मी स्वत: हॉटेल मध्ये असताना एक दोनदा, "तुमची पुरणपोळी आणि मोदक महाग आहे बुवा!" अशी तक्रार माझ्यासमोरच काहींनी केली होती. या सगळ्यांना काय म्हणायचं आहे ते मी समजू शकतो. त्यामुळे या तक्रारीबद्दल थोडंस स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, जे मोकळ्या मनाने वाचतील त्यांना आमची बाजू थोडीफार तरी…

हॉटेल पाहावं चालवून

परवा माझा मामा आणि मी सकाळी एकत्र योगासने करीत होतो. डॉक्टर असलेल्या माझ्या या मामाचा मन, बुद्धी या विषयीचा विशेष अभ्यास आहे. मनःस्वास्थ्यासाठी आणि शरीरस्वास्थ्यासाठी योगासनांचं महत्त्व काय आहे? कोणतं योगासन शरीराच्या कोणत्या भागांना व्यायाम देतं वगैरे माहिती त्याच्याकडून ऐकत ऐकत योगासनं करायला मजा येते. तो राहतो विजयदुर्गला. इकडे आला की त्याच्याबरोबर योगासनं करायची संधी मी सोडत नाही. परवा पण सगळी योगासनं झाली. सर्वात शेवटी माझं आवडतं आसन... शवासन…

स्टार्टर्

असं म्हटलं जातं की लोकांच्या हृदयापर्यंतचा प्रवास पोटातून सुरु होतो. म्हणजे ज्याचे मन आपल्याला जिंकायचे आहे त्याला चांगले, त्यांच्या पसंतीचे पदार्थ बनवून खायला घाला. उच्चपदस्थ, राष्ट्राध्यक्ष यांच्यात चाललेली dinner diplomacy हेच तर दर्शवते. पूर्वी नवविवाहितेला सांगण्यात यायचे की बाई ग नवऱ्याला जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. पण माझा स्वतःचा प्रवास मात्र हृदयापासून सुरू होऊन पोटाकडे गेला. म्हणजे त्याचं असं झालं की मी माझं शिक्षण संपताच डॉक्टर…