संस्कृती आणि सुखप्रसूती

स्त्रीचे बाळंत होणे आज किती सुलभ झाले आहे. स्त्री बाळंतपणाच्या कळा सोसत असताना नर्स, डॉक्टरांची फौज दिमतीला असते. बाहेर स्त्रीचा पती, सासू-सासरे, आई-वडील सगळेच बाळाच्या टॅहा टॅहा ची वाट पाहात असतात. एकेकाळी स्त्रीला ती बाळंत व्हावी म्हणून उलटे टांगत किंवा सतरंजीवर निजवून ती वर उचलून खाली आपटीत असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. जगभर सगळीकडेच धर्म आणि विज्ञानाचा झगडा सुरु होता आणि अनेकांच्या अथक प्रयत्नातून अखेर वैद्यकशास्त्र अनंत अडचणीतून मार्ग काढत उत्क्रांत होत गेले. स्त्रीची प्रसूती आणि प्रसूती संबंधीत अनेक बाबींचा हा  जगभऱचा इतिहास आणि वाटचाल वाचताना आपण सैरभैर होतो, विमनस्क होतो आणि तो काळ आता सरला आहे हे लक्षात आल्यावर सुटकेचा निःश्वासही टाकतो- स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात 'आरोग्यमंदीर' मध्ये प्रसिद्ध झालेला डॉ. वि. म. भट यांचा हा लेख