मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलं

आपण कुठेही बाहेरगावी निघालो की प्रथम  त्या गावात राहण्या-खाण्याचा काय बंदोबस्त आहे ते पहातो . सध्याच्या इंटरनेट युगात तर हे काम एका 'क्लिक' सरशी होते. संगणकाशी चार-पाच मिनिटं खेळून आपण जिथे निघालो आहोत तिथलं एखादं हॉटेल  बुक  करून  निश्चिन्त होतो. मध्ययुगीन हिंदुस्थानात अशी हॉटेलं होती का ? हिंदुस्थानाबाहेरून जे  लोक (परदेशी प्रवासी ) येथे यायचे, ते आपल्या राहण्या-खाण्याची काय सोय करायचे? चला पाहूया गतकाळात डोकावून !

मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलांविषयी आपल्या परदेशी प्रवाशांच्या वृत्तांतातून माहिती मिळते. १७ व्या शतकामध्ये बरेच युरोपियन प्रवासी हिंदुस्थानात येत. काही जण व्यापारासाठी , काही जण डॉक्टर म्हणून , काही जण सैनिक म्हणून , काही जण आपल्या राजाचे प्रतिनिधी म्हणून , काही जण साहस करण्याच्या ओढी पायी तर काही जण केवळ उत्सुकता म्हणून येथे येत. या पैकी बहुतेक प्रवाशांनी आपण हिंदुस्थानात काय पाहिले, कसे राहिलो , कसा प्रवास केला , येथील लोक कसे आहेत याबाबत तपशीलवार लिहून ठेवले आहे . त्यांचे प्रवासवृत्तांत मनोरंजक आणि माहितीपूर्ण तर आहेतच , शिवाय या प्रवासवृत्तांतां मधून आपल्याला आधुनिक काळातील काही गोष्टी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या काळातही अस्तित्वात होत्या ! हे  वाचून आश्चर्य वाटते . या गोष्टींपैकींच एक  गोष्ट म्हणजे हॉटेलं!

दहावीची बॅच

"दहावीची बॅच"ही कविता कोणी लिहिलीय माहीत नाही , पण ती प्रत्येकाची 'मनकी बात' तर नाही ना?   "दहावीची बॅच"   प्रत्येकाची दहावीची बॅच असते कोण कुठे आहे माहिती नसलं कधीच भेटणं होत नसलं तरी ती प्रत्येकाच्या मनात असते   दहावीच्या बॅचची एक गंमत असते पन्नाशी पार केलेला तो सासरा झालेला असतो, पन्नाशी पार झालेली ती सासू झालेली असते, तरी सुद्धा…

बाबरी : जे दिसले तेच सांगितले

विषय तसा नाजूक असल्यामुळे पोस्ट टाकण्यापूर्वी गुगलकाकांना विचारलं. हे मुहम्मद गृहस्थ खरंच अस्तित्वात आहेत आणि वर उल्लेखलेली मतं त्यांचीच आहेत याची खात्री करून घेतली. whatsapp वर आलेली सदर पोस्ट खरी आहे. जिज्ञासूंनी त्यांच्या नावावरील लिंक क्लिक करावी.

बाहुली, स्त्री शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी !!

क्रांतिज्योती सावित्रीमाईंबद्दल वाचत असताना बाहूलीच्या हौदाचा उल्लेख सापडला. त्यानंतर शोधले असता हा उल्का मोकासदारांचा लघुलेख मिळाला. समाजाच्या उद्धारासाठी किती ज्ञात-अज्ञात आहूती पडल्या, माता भगीनीचा शिक्षणासाठीचा संघर्ष कामी आला आहे.. भाऊबीज महिलांसाठी या दिवसाचे खुप महत्त्व.पण १७५ वर्षापूर्वी याच दिवशी पुणे नगरीत एक खुप मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली. बाहुलीच्या हौदाचे लोकार्पण बाहुलीचा हौद ? बाहुली कोण ? या हौदाचे एव्हढे महत्व…

असे देखणे होऊया !!

'कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेतले 'देखणे'पण आपल्या सर्वांना मिळो' दिवाळीच्या निमित्ताने या  शुभेच्छा !! देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे । गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥ तेच डोळे देखणे, जे कोंडीती सार्‍या नभा । वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥ देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे। आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥ देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे । मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे…