सर्जनशीलता

केव्हा फोकस्ड अटेन्शन वापरायचे आणि केव्हा ओपन अटेन्शन वापरायचे, सर्जनशीलता वाढवण्यासाठी माइंडफुलनेस कसा उपयोगी ठरतो हे समजून घेणे रंजक आहे.

मेंदूतील विचारांची दोन नेटवर्क

मेंदूचे व्यवस्थापकीय कार्य, त्याचे एक्झिक्युटिव्ह नेटवर्क फंक्शन, डिफोल्ट मोड फंक्शन या सगळ्या गोष्टी सोप्या शब्दात समजावून देणारा आणि सजगता वाढवायला मदत करणारा लेख.

दिवास्वप्नात रमण्याची सवय

आदित्य सायकल चालवायला शिकला म्हणजे सायकल चालवणे त्याच्या सवयीचे झाले. आता त्याने त्याच्या घरातून सायकल बाहेर काढली की ठरलेल्या रस्त्याने त्याला शाळेत पोचायला मोजून बारा मिनिटे लागतात असे तोच सांगतो. या बारा मिनिटांत रस्त्याला तीन वळणे लागतात, पण सायकल तेथे आपोआप वळते, तोल सांभाळला जात असतो, पाय पेडल मारत असतात, अचानक रस्त्यात काही अडथळा आला तर आपोआप ब्रेकही मारले जातात. असा ब्रेक लागला तरच आदित्य त्याच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येतो. नाहीतर सायकल चालत असते त्यावेळी आदित्यच्या मनातील विचारांची सायकल ही चालूच असते. शाळेत आज काय होईल, गार्गीचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नसेल तर तिला मिस ओरडतील का, सौरभशी पंगा घ्यायचा का, एकाला जोडून दुसरा विचार येत असतो, आदित्य कल्पनेच्या राज्यात, दिवास्वप्नात रमलेला असतो. आदित्य सारखेच आपण सर्व जण एखादे सवयीचे काम करीत असतो त्यावेळी विचारात वाहत असतो, बऱ्याचदा दिवास्वप्ने पहात असतो, कल्पनेच्या राज्यात रमत असतो. साधारण दोन वर्षांची झाली की मुले कल्पना करू लागतात. खोटे खोटे मम्मी पप्पा होतात, टीचर होतात. पूर्वीचा भातुकलीचा खेळ या कल्पनाराज्यालाच प्रोत्साहन देणारा होता. मुलांनी असे कल्पनाविश्वात रमणे त्यांच्या मेंदूच्या विकासाला मदत करते असे आजचे मेंदूविज्ञान सांगते.

निराश होण्याची सवय

छोटी जुईली चालायला शिकत होती. उभे राहून शरीराचा तोल सांभाळत तिने एक पाउल टाकले की सर्वजण टाळ्या वाजवून तिचे कौतुक करायचे. दोन,चार पावले टाकून झाली की तिचा तोल जायचा,ती पडायची. ते पहाताना मी विचार करू लागलो की चालता येणे हे देखील केवढे अवघड कौशल्य आहे. आपण सर्वजण पहिली पावले टाकताना असेच धडपडलो असणार,पडलो असणार. पण त्यावेळी आपण निराश झालो नाही. प्रयत्न चालू ठेवले. आता आपण आपल्या नकळत चालत असतो,मनात असंख्य विचार येत असतात,आणि पाउले आपोआप पुढे पडत असतात,शरीराचा तोल सांभाळला जात असतो. दोन पायांवर तोल सांभाळत उभे राहणे ,त्यातील एक पाय उचलून पुढे टाकणे हे  कधीकाळी आपल्याला खूप अवघड वाटत असणार पण त्याची आठवणहि आता होत नाही. चालण्याचा नियमित सराव केला की ते सवयीचे होऊन जाते,आपल्या  नकळत होऊ लागते.

  • 1
  • 2