काही मराठी शब्दांची व्युत्पत्ति

(१) अब्रू ‘अब्रू’ ह्या शब्दाचा अर्थ ‘कीर्ती ’ असा मुख्यत: व्युप्तत्तिदृष्ट्या होतो. ‘अब्रूची चाड’, ‘अब्रूदार मनुष्य’, ‘बेअब्रू’ वगैरे ठिकाणी ‘अब्रू’ म्हणजे ‘कीर्ती ’ हाच अर्थ सरळ दिसतो. व्युप्तत्तिदृष्ट्या पाहिले असताही ‘अब्रू’ म्हणजे ‘कीर्ती ’ ह्याच अर्थाला बळकटी येते. कारण ‘अब्रू’ हा शब्द ‘अ’ आणि ‘ब्रू’ ह्या दोन घटक शब्दांपासून बनलेला ...
क्रमश:

…आणि नारदमुनी गायब झाले!

महर्षी नारद भगवान श्रीविष्णूला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्याच नावाचा ‘नारायण नारायण’ असा मंजुळ जयघोष करीत आणि चिपळ्यांचा नाद आसमंतात उमटवित जाऊन पोचले. भगवान विष्णू शेषावर विराजमान होऊन गरमागरम चकल्यांचा आस्वाद घेत होते. नारदाचा आवाज ऐकल्या ऐकल्या माता लक्ष्मीने चकल्यांची आणखी एक थाळी भरायला घेतली होतीच, चकलीच्या तिखट स्वादाला अधिक चव यावी ...
क्रमश:

स्मरण एका ‘रारंगढांग’ कलावंताचे

प्रभाकर पेंढारकर यांच्या ‘रारंगढांग’  या कादंबरींचे मराठी साहित्यातले स्थान आणि महत्व अनन्यासाधारण आहे.  बाल आणि कुमार  साहित्याकडून वाचक जेव्हा प्रोैढ साहित्याकडे वळू इच्छितो तेव्हा ही कांदबरी या दोन्हीतला दुवा म्हणून काम करते. भाषा सोपी परंतु आशय सार्वकालिक. या कांदबरीचे दुर्दैव असे की तीवर चित्रपट काढण्याचे सर्व प्रयत्न आजवर अपूर्ण राहिले ...
क्रमश:

अकाली वार्धक्य

दिवाळी साजरी करीत असतानाच वयाच्या चाळीशीतील स्वानंदला थकवा जाणवू लागला. तपासण्या केल्यानंतर त्याला मधुमेह आहे असे नक्की झाले. त्याचा रक्तदाब ही वाढलेला होता. त्याच्या डोळ्यात मोतीबिंदूची  वाढ होऊ लागली होती. पूर्वी वयाच्या साठीनंतर हे सर्व आजार दिसू लागायचे. पण हल्ली चाळीशीतच हे वार्धक्यात होणारे आजार दिसू लागले आहेत. माणसाचे आयुर्मान ...
क्रमश:

सचिनगौरवातील एक कौतुकास्पद आगळेपण !

क्रिकेट,राजकारण आणि चित्रपट ही भारतीयांची खास वादांची,आवडीची आणि हमरीतुमरीवर येऊन चर्चा करण्याची क्षेत्रे. या तिन्ही क्षेत्रात कुणाचीच सद्दी फार काळ चालत नाही. परंतु सद्दी संपल्यावरही ज्यांचा दबदबा आणि करिष्मा कायम राहतो अशा व्यक्ती दंतकथा होतात.चालू वर्तमान काळाने अलिकडेच अनुभवलेली अशी दंतकथा म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनला निवृत्त होऊन येत्या १६ तारखेला ...
क्रमश:

टिळक-गोखले यांची शेवटची भेट….

लेखक: ग. वि. केतकर लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांची प्रत्यक्ष शेवटची भेट १९१४ च्या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झाली. टिळकपक्ष कॉंग्रेसमध्ये यावा यासाठी बेझंटबाई प्रयत्न करीत होत्या. त्या आणि त्यांचे सहकारी श्री. सुब्बाराव हे ‘सर्व्हंट ऑफ इंडिया’ सोसायटीमध्ये उतरले होते. दि. ६ ला सकाळी व दुपारी टिळक त्यांना भेटले. यावेळी ...
क्रमश:

या, चकल्या पाडूया…!

दिवाळी आणि चकली याचे समीकरण कधी आणि कोणी जन्माला घातले ते माहिती नाही,परंतु ते आहे हे मात्र खरे. तर, ऐन दिवाळीच्या तोंडावर आपण आता पाहूया चकलीची एक अत्यंत वेगळ्या प्रकारची रेसिपी- पुनश्चवर आत्ता हा नि:शुल्क लेख आपण वाचलात. कसा वाटला? आवडला का?

ही तर केवळ एक झलक आहे. याहूनही एकापेक्षा एक ...
क्रमश:

लखनौ कॉंग्रेस १९१६ : असा प्रवास आणि अशी व्यवस्था

काळ बदलला तसे राजकीय नेते-कार्यकर्ते बदलले. पक्षांची अधिवेशने ही आता पंचतारांकित असतात. कारण पक्षांकडे निधी आणि निधींचे स्त्रोत भरपूर असतात. १९१६ साली लखनौ येथे झालेले काँग्रेसचे अधिवेशन गाजले ते लोकमान्य टिळक आणि जिना यांच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय समितीने तयार केलेल्या करारावर  शिक्कामोर्तब  झाल्याने. टिळकांनी ह्या करारावर ’Lucknow’ वरून ’Luck now’ अशी कोटीही तेव्हा केली होती. परंतु ...
क्रमश:

शैशवास जपणे

लेखक: मुकुंद टांकसाळे The life of every person is like a diary in which he means to write one story, and writes another, असं एक इंग्रजी वचन आहे. परंतु आपला तर अनुभव असा असतो की मुळात स्टोरी लिहिलीच जात नाही. केवळ संकल्पच सोडले जातात. ‘संकल्प सोडणे’ यांतच सोडणे हा शब्द ...
क्रमश:

अंत सात्विक संतापाचा….

लेखिका: मीना वैशंपायन रस्त्याने जाताना एखादा कुणीतरी आपल्या लहानग्या मुलाला फरफटत नेताना  दिसला की,आपल्याला त्या माणसाचा राग येतो. बसमधून जाताना आपल्या शेजारी एखादा वृद्ध उभा हे आणि कुणीही तरूण त्याला उठून जागा देत नाही हे लक्षात आलं की आपल्याला राग येतो. ते मूल किंवा तो वृद्ध आपला कुणी नातेवाईक नसतो, ...
क्रमश:

आणखी एक पतंगबाजी… चक्क विमानातून

आणखी एक पतंगबाजी… पतंग उडवण्याचा उत्सव मुख्यतः गुजरातमध्ये साजरा होत असला तरी राजकीय पतंगबाजीत मात्र महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यातही सोशल मिडीया आल्यावर घरबसल्या पतंगबाजी करता येऊ लागली आहे त्यामुळे सोशल मिडीयाच्या आभाळात सतत पंतग तरंगताना दिसतच असतात.  आत्ता परवाच जाणता राजा आणि गर्दीचा राजा, हे दोघे औरंगाबादला एकाच हॉटेलमध्ये थांबले ...
क्रमश:

ज्ञाननिर्मितीत कायम दुय्यम?

‘अनेकता मे एकता’ हे वाक्य आपण आपलं वैशिष्ट्य म्हणून मिरवतो आणि त्याचे गोडवे गातो. प्रत्यक्षात एक समाज म्हणून आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या सामाजिक संवेदना एकसमान नसल्यामुळे अनेक प्रश्नही निर्माण झालेले आहेत, त्यांकडे आपण कानाडोळा करतो. जगाच्या तुलनेत विज्ञानाच्या क्षेत्रात,संशोधनात आपण मागे का आहोत हा प्रश्न अनेकदा विविध निमित्तांनी आजवर ...
क्रमश: