अमेरिकन व्हिसाचे मृगजळ

गेल्या ४ महिन्यांमध्ये या ना त्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये जाण्याचा योग आला. जानेवारीत डॉक्टरांच्या ट्रिपच्या निमित्ताने थायलंड झालं. फेब्रुवारीत सिंगापूर मलेशियातील काही व्यक्ती, ज्या आपलं क्लिनिक तिकडे उघडण्यासाठी interested आहेत त्यांना भेटायला गेलो. मार्च महिना लंडनमध्ये आपल्या तिकडच्या क्लिनिकच्या set-up मध्ये गेला. आत्ता एप्रिलमध्ये डॉ. रोहित सान्यांबरोबर जागतिक हृदयरोग परिषदेत ...
क्रमश:

ठणठणपाळांनीही हातोडा फेकून दिला असता!

मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणाची फिरकी घेत नाही. मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणावर टीका करत नाही. एकही मराठी साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाच्या प्रतिभेविषयी शंका घेत नाही. एकही मराठी साहित्यिक मीच कसा थोर आणि तो कसा चोर असं म्हणत नाही. रात्रीच्या बसण्याच्या मैफलीत एखाद्या साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाला, किमानपक्षी एखाद्या संपादकाला ...
क्रमश:

त्या दोघी

मराठी कथांची वाट आणि घाट सतत बदलत आलेला आहे. अर्थात समाजात होणारे बदल कथांमध्ये प्रतिबिंबित होत असतातच. भाषा, विषय, संवादांची शैली आणि व्यक्तिरेखा यावर त्या त्या काळाचा एक ठसा असतोच असतो. प्रस्तुत कथा १९७२ साली लिहिली गेली आहे मात्र कथेतला काळ त्याहून मागचा म्हणजे १९४१ सालातला आहे. कथेचा आणि नाव ...
क्रमश:

सजग कर्ता

लेखक: डॉ यश वेलणकर मोहनराव स्वतःला आध्यात्मिक म्हणवून घ्यायचे. रोज ठराविक वेळ पूजा, नामस्मरण नेमाने करायचे..ठेविले अनंते तैसेची राहावे हा अभंग सतत तोंडाने म्हणत तसेच वागायचे..त्यांनी संसारात कधी लक्षच दिले नाही अशी त्यांच्या बायकोची रास्त तक्रार आहे. त्यांनी  कोणतीच जबाबदारी घेतली नाही. एक नोकरी आयुष्यभर केली पण त्या नोकरीत कोणतीही ...
क्रमश:

भूतलावर स्थिरावलेल्या देवांगना

अजिंठा लेण्यांचे आजचे रुप पाहूनही त्याच्या मूळ सौंदर्याची कल्पना येते. अद्वितीय हा शब्द हल्ली आपण फार सहजपणे कुठेही वापरतो. परंतु अजिंठ्यातील कोरीव लावण्य पाहिल्यावर या शब्दाचा खरा अर्थ कळतो. मात्र कलाकृतींचे आणि त्यातही इतिहासाचे मोल  न कळणाऱ्या आपल्या समाजाने हे लेणे नीट जपले नाही याची खंतही तेवढीच आहे. भय्यासाहेब ओंकार ...
क्रमश:

काही मराठी शब्दांची व्युत्पत्ति भाग २

(२) ‘आयतं’ ‘अब्रू’तील ‘अ’ हा मूळच्या ‘आ’ ह्या उपसर्गाचा संकोच आहे, व हा संकोच ‘अक्कल’, ‘अदमी’, ‘अडका (पैसा-अडका)’ इत्यादि शब्दांतही आढळतो असे ‘अब्रू’ शब्दाची व्युत्पत्ति देताना दर्शविले आहे, त्या वेळी ह्या बाबतीतला अधिक विस्तार पुढल्या लेखांत करू असे आश्वासन दिले होते; तरी प्रथम उपरिनिर्दिष्ट विस्तार थोडक्यात करून नंतर ‘आयतं’ ह्या ...
क्रमश:

पुलं आणि भिंतीची खुंटी

मी आपला सावकाश चाललो होतो, तेवढ्यात ते मला घाईघाईनं जाताना पाठमोरे दिसले. पत्रकार एकेकाळी वापरायचे तसली झोळी खांद्याला अडकवून ते भराभरा चालत होते. ते माझ्याच काय संबंध महाराष्ट्राच्या आणि जिथे कुठे मराठी माणसं असतील त्या सगळ्यांच्या एवढे परिचयाचे आहेत की मागून, पुढून, डावीकडून, उजवीकडून, टॉप अँगलने कुठल्याही बाजूनं दिसले तरी ...
क्रमश:

स्त्री- शंभर वर्षे झाली तरीही….

बंडखोरी कोणत्या काळात केली जाते याला मोठे महत्व आहे. १९२० साली स्त्री स्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती या कल्पना युरोपातसुध्दा रूळल्या नव्हत्या अशा काळात गीता साने या एका वैदर्भीय मराठी विदुषीने महाराष्ट्रात स्त्री स्वातंत्र्याचा हुंकार उमटवला हे धाडस आजही तेवढेच मोठे आणि मोलाचे वाटते. एका बाजूला समाजातून स्त्रीला शिक्षण, नोकरी, कर्तृत्व या बाबतीत ...
क्रमश:

कवितेची कथा….आणखी काही कविता

कविता समजून घेण्यासाठी,तिचा आस्वाद घेण्यासाठी एक अतिरिक्त इंद्रिय लागतं असं म्हणतात. आपल्याला आवडलेली कविता इतरांपर्यंत पोचवण्यासाठी केवळ ते इंद्रिय असून चालत नाही तर एक वेगळी संवेदनशिलताही हवी असते. डॉ प्रल्हाद देशपांडे हे व्यवसायाने दंतवैद्य आहेत. सोप्या मराठीत ते डेंटिस्ट आहेत. लोक त्यांच्यापुढे आ वासतातच परंतु त्यांनी विविध कवितांचं केलेलं हे ...
क्रमश:

काही मराठी शब्दांची व्युत्पत्ति भाग १

(१) अब्रू ‘अब्रू’ ह्या शब्दाचा अर्थ ‘कीर्ती ’ असा मुख्यत: व्युप्तत्तिदृष्ट्या होतो. ‘अब्रूची चाड’, ‘अब्रूदार मनुष्य’, ‘बेअब्रू’ वगैरे ठिकाणी ‘अब्रू’ म्हणजे ‘कीर्ती ’ हाच अर्थ सरळ दिसतो. व्युप्तत्तिदृष्ट्या पाहिले असताही ‘अब्रू’ म्हणजे ‘कीर्ती ’ ह्याच अर्थाला बळकटी येते. कारण ‘अब्रू’ हा शब्द ‘अ’ आणि ‘ब्रू’ ह्या दोन घटक शब्दांपासून बनलेला ...
क्रमश:

…आणि नारदमुनी गायब झाले!

महर्षी नारद भगवान श्रीविष्णूला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्याच नावाचा ‘नारायण नारायण’ असा मंजुळ जयघोष करीत आणि चिपळ्यांचा नाद आसमंतात उमटवित जाऊन पोचले. भगवान विष्णू शेषावर विराजमान होऊन गरमागरम चकल्यांचा आस्वाद घेत होते. नारदाचा आवाज ऐकल्या ऐकल्या माता लक्ष्मीने चकल्यांची आणखी एक थाळी भरायला घेतली होतीच, चकलीच्या तिखट स्वादाला अधिक चव यावी ...
क्रमश:

स्मरण एका ‘रारंगढांग’ कलावंताचे

प्रभाकर पेंढारकर यांच्या ‘रारंगढांग’  या कादंबरींचे मराठी साहित्यातले स्थान आणि महत्व अनन्यासाधारण आहे.  बाल आणि कुमार  साहित्याकडून वाचक जेव्हा प्रोैढ साहित्याकडे वळू इच्छितो तेव्हा ही कांदबरी या दोन्हीतला दुवा म्हणून काम करते. भाषा सोपी परंतु आशय सार्वकालिक. या कांदबरीचे दुर्दैव असे की तीवर चित्रपट काढण्याचे सर्व प्रयत्न आजवर अपूर्ण राहिले ...
क्रमश: