अंक - महाराष्ट्र, १९५४
पाकिस्ताननें अमेरिकेशीं लष्करी मदतीचा करार केल्यामुळे सर्व आशियांतील राष्ट्रांचीच सत्तासमतोलता ढांसळून गेली आहे आणि त्यामुळे युद्ध हिंदुस्थानच्या दारीं आलें आहे असा प्रचाराचा तडाखा पं. नेहरू यांनी सतत उठवला आहे. या प्रश्नाची दुसरी एक बाजू प्रा. श्री.म. माटे यांनी दाखवली आहे.
सध्यां भारतांत अमेरिकेचा अधिक्षेप फार जोरानें चालू आहे. तो जोराने चालू असावा याचा मोठा विस्मय वाटतो. सर्वांना असे भय पडले आहे की, पाकिस्तान अमेरिकेकडून लष्करी मदत घेऊन बसेल आणि ह्या मदतीच्या बळावर तें भारतावर आक्रमण करील; प्रत्यक्ष भारतावर जरी पाकिस्तानने आक्रमण केलें नाहीं तरी काश्मीरच्या बाबतींत, या मदतीमुळे पाकिस्तान अधिक ताठर बनेल, आणि काश्मीर कदाचित आपल्या हातचे जाईल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .