आणि ह्यांनी ‘‘इतिहास’’ लिहिला

पुनश्च    अरविंद ताटके    2018-10-24 06:00:23   

लेखक: अरविंद ताटके     या महिन्यात रियासतकार सरदेसाई यांच्या शताब्दीची धूम मोठ्या थाटामाटात उडेल. तेव्हा या समयी, ज्या ज्या व्यक्तींचा मराठी इतिहासाशी - ऐतिहासिक ग्रंथांशी संबंध आला, त्यांचे स्मरण होणे साहजिक आहे. मराठी इतिहास प्रथम युरोपियन लेखकांनी लिहिला; तेव्हा त्यांचेही ऋण आपल्यावर असल्याने त्या सगळ्यांचे स्मरण करणे उचित होय. तो पाहिलात का छत्तीस वर्षाचा तरुण, प्रकाशकाशी कशी हुज्जत घालतो आहे ती. पण तरी काही त्याची दाद लागत नाही. तेव्हा प्रकाशकाने काढली तोड. तो त्याला म्हणाला, ‘‘तुझ्या ग्रंथाचं, ‘मराठ्यांचा इतिहास’ हे नाव बदल बुवा. हे नाव ठेवलंस तर खपाची आशाच नको.’’  ‘‘काय म्हणता, नाव बदलू! ते कालत्रयीही शक्य नाही.’’ त्या तरुणाने जबाब दिला. पुढे त्याने वीस हजार रुपये पदरचे खर्च केले अन्‌ केला आपला ग्रंथ प्रसिद्ध. आहे की नाही जिद्द! त्या ग्रंथाचे नाव ‘ए हिस्टरी ऑफ दि मराठाज्‌.’ तो पहा निराश होऊन रंगी बापूजी इंग्लंडातून इकडे परतत आहे. त्याच्या इंग्लिश मित्रांनी एक चांदीचे तबक सह्या करून त्याला दिले बक्षीस. त्यात ह्या तरुणाचीही सही होती बरं का! या तरुणाचे नाव ग्रँट डफ; मराठ्यांचा आद्य इतिहासकार तो हाच. आमच्या शेवटच्या छत्रपतींचे-प्रतापसिंह भोसल्यांचे स्मरण करीत करीत याने इंग्लंडात देह ठेवला. याच्या ग्रंथावर राजवाड्यांनी सडकून टीका केली खरी. पण याचा ग्रंथ मात्र ते सतत जवळ बाळगीत. तो पहा रावबाजी, (दुसरा बाजीराव) पन्नाशीच्या घरात असलेल्या गृहस्थाच्या हातावर मराठी राज्याचे उदक सोडीत आहे. मग या गृहस्थाने रावबाजीची रवानगी केली ब्रह्मावर्ताला, हरी हरी करण्यासाठी, काय म्हणता? हा गृहस्थ राक्षसासारखा दिसतो! हो. हो. आहे खरा हा धिप्पाड. शिकारीचा हा फार नादी. तहा

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



ज्ञान रंजन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts