‘साष्टांग नमस्कार’ आणि आचार्य अत्रे

अलौकिक प्रतिभा, उपजत विनोदबुद्धी यांसोबत मराठी आणि इंग्रजी नाटककारांचे संस्कार यातून निर्माण झालेले आणि प्रचंड यशस्वी ठरलेले नाटक साष्टांग नमस्कार याची जन्मकथा लेखक आचार्य अत्रेंच्याच शब्दांत वाचा.

नवबौद्धांच्या राजवाड्यात एक मुलाखत

बाबासाहेबांच्या आवाहनाला साथ देऊन लाखोंनी धर्मपरिवर्तन केले. या नवबौद्ध झालेल्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांचा घेतलेला मागोवा.

मंत्रिपदाचा ‘शबे आखिर’

काकासाहेब गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडळात( १९४७ ते १९५२ ) मंत्री होते. नेहरूंशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांना पुढच्या ५ वर्षांसाठी संधी नाकारण्यात आली. काय होते ते मतभेद? का त्यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली? या प्रश्नांची उत्तरं आणि मंत्रिपदाच्या या काळात त्यांना आलेले अनुभव त्यांनी या लेखातून मांडले आहेत.

एक ‘भाषांतर’ अनुभव

यावेळेचा हा 'अनुभव' सदरातील लेख भाषांतर तज्ञ डॉ. अनघा भट यांचा आहे. लेखिका स्वतः रशियन भाषेच्या तज्ञ आहेत आणि पुणे विद्यापीठात रशियन एम.ए. साठी भाषाविज्ञान व भाषांतरसिद्धान्त हे विषय त्या शिकवतात. बारामतीला झालेल्या द्राक्ष बागायतदारांच्या एका कार्यक्रमाला त्या दुभाष्या म्हणून उपस्थित होत्या. तिथले अनुभव त्यांनी या लेखातून मांडले आहेत जे मुळातून वाचण्यासारखे आहेत. पुनश्चमध्ये अनुभव हे सदर देण्यामागचा हेतू एक सर्वस्वी वेगळं आयुष्य वाचकासमोर आणण्याचा आहे. या लेखातून तो १००% साध्य होतोय. जाता जाता...आपण सहज म्हणून जे इंग्रजी शब्द वापरतो त्यांना लेखिकेने किती छान पर्यायी मराठी शब्द वापरलेत पहा...

  • 1
  • 2