अर्थसंस्कार- कर्ज

'अर्थकारण' या सदरात उदय कर्वे यांच्या 'अर्थसाक्षरता' मालिकेतला दुसरा लेख समाविष्ट केला आहे. आरोग्यसंस्कार मासिकातील ही मालिका त्यावेळी खूप वाचकांना पसंद पडली होती. या लेखात कर्वेसरांनी 'कर्ज' या विषयाचा त्यांच्या टिपिकल 'पुणेरी' कर्वे शैलीत समाचार घेतला आहे.

कवितेची कथा

आजच्या या कविता रसास्वाद सदरातल्या तीनही कविता चुकवू नयेत अशाच. जे कवितेचे प्रेमी असतील त्यांना तर या कविता पुन्हा प्रेमात पाडतीलच पण या प्रेमाशी अनभिज्ञ असणाऱ्यांनी तर या नक्कीच वाचा. पण हा... इतके दिवस आपण या सुखाला का बरं पारखे राहिलो म्हणून विषाद वाटून घेऊ नका. कारण शेवटी 'जहाँ से जागे, वहीसे सबेरा' हेच खरं.

माजघरातील मंद समई

६ जानेवारी २०१३ ला पहाटे आई साने गेल्या म्हणजे लौकिकार्थाने आपल्या सर्वांना सोडून पंचतत्त्वात विलीन झाल्या. डॉ. रोहित सानेंच्या आई या नात्याने,  सगळ्या साने केअर कुटुंबाच्या त्या आईच होत्या. बाबा साने (डॉ. माधव साने) २००४ मध्येच आपल्याला सोडून गेलेले, आता आई ही गेल्या. अक्षरक्ष: साने केअर कुटुंबाला पोरकं करून गेल्या. खरं तर, वहिनीचं म्हणजे माझ्या भावाच्या बायकोचं माहेर, एवढ्या जवळ…