व्हिलन

सुक्ष्मातली खलप्रवृत्ती मानवाच्या विपरीत स्थितीत आणि काळावर मात करूनही टिकून राहते याचा प्रत्यय देणारी कथा.

सामना

कनिष्ठ मध्यमवर्गाचं आर्थिक दुबळेपण, त्यातून होणारी घुसमट, तत्व आणि वास्तव यातलं प्रचंड अंतर, या सगळ्यातून शेवटी विद्रोह करण्याचं धाडस दाखवणारी तरुणी या कथेत विलक्षण रंग भरते.

बोधकथा

शब्दांचे फार अवडंबर न माजवता, शैलीचा फार बडेजाव न सांभाळता मोजक्या शब्दात आणि थेट भिडेल असे खूप काही सांगून जाण्याची ताकद बोधकथांमध्ये असते.

एक होता पोपट

'कथा' विभागातली ही पहिलीच कथा. सुरुवातीला मी 'पुनश्च'मध्ये कथा घ्याव्यात की नाही याबाबत साशंक होतो. पण नंतर लक्षात आलं की माणसाला किती गज जमीन लागते हे सांगणारी टाॅलस्टाॅयची कथाच होती. इसापनीती, पंचतंत्र यादेखील कथाच होत्या. मग मनाची द्विधा संपली. ज्या कथांमधून काही बोध होईल त्याच कथा घ्यायच्या. 'एक होता पोपट' ही विलास पाटील यांची कथा वाचल्यावर तुम्हाला कितीतरी असे रंगीतसंगीत पोपट तुमच्या आजूबाजूला 'उडताना' दिसतील.