पुनश्च : दुसरी घंटा

उद्या, म्हणजे ३० सप्टेंबरला, तीसरी घंटा वाजेल आणि  #पुनश्च या मराठीतल्या पहिल्याच डिजिटल नियतकालिकाचा पहिला प्रयोग म्हणजे पहिला सशुल्क लेख प्रसारित होईल. वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी हा एक मोठा भूमिकाबदल असेल. truecaller या app वर माझं प्रोफाईल तुम्ही बघितलंत तर डॉ. किरण भिडे असं दिसेल. माधवबागशी सबंधित असण्याचा परिणाम. कोणी ते प्रोफाईल बनवलं मलाही ठाऊक नाही, पण वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा तो…

लोकसत्तातील लेख

रविवार १७ सप्टेंबर रोजी लोकसत्ता दैनिकाच्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख थोडा सुधारून परत देत आहे. पेपरवरून डिजिटल माध्यमात जाताना काय काय करू शकतो याचा एक अंदाज तुम्हाला येईल. ग्रंथसखाची लिंक , पहिला केसरी चा अंक आणि दर्पण, मुंबई अखबार ची एका पुस्तकातील माहिती देणारे फोटो टाकता आले. अजून तुमच्याही काही कल्पना असतील तर कळवा.