महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक समस्या: रामदेवराव यादव

आपल्यापैकी पुरंदरे याचं 'शिवछत्रपती' वाचलं नाही असे वाचक विरळाच असतील. त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात वर्णन केलेल्या देवगिरी साम्राज्य आणि त्याचा राजा रामदेवराय याच्याबद्दल माझ्या मनात कायमच कुतूहल राहिलं. एवढं मोठं साम्राज्य, सेना असताना तो खिलजीच्या काही हजार फौजेपुढे कसा हरला? 'प्रसाद' मासिकाच्या मे १९७३च्या अंकात आलेला 'महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक समस्या' हा लेख नक्की वाचावा असा.