मेंदूतील सवय – डॉ यश वेलणकर

कळतं पण वळत नाही ही म्हण तुम्हाला माहीत असेलच आणि तुमचा तो रोजचा अनुभव ही असेल. Lots of people know what to do but very few people do what they know - हे अँथनी रॉबिन्स यांचे प्रसिद्ध वाक्य आहे। आजच्या माहितीच्या युगात आपल्याला माहिती खूप असते पण त्या माहितीचा रोजच्या जीवनात उपयोग होतोच असे दिसत नाही। रोज व्यायाम आवश्यक आहे हे आपल्याला पटलेले असते पण तो होत नाही। राग अनावर होता नये याची
जाणीव असते पण तरीही तो अनावर होतोच।नखे खायची नाहीत असे मनोमन ठरवलेले असते पण नकळत बोटे तोंडात जातातच। हे सर्व सवयीने घडते। आपला स्वभाव हीदेखील मनाची प्रतिक्रिया करण्याची सवयच असते। चहा, तंबाखू, इंटरनेट ही व्यसने म्हणजे देखील सवयच असते। आपली विचार करण्याच्या पद्धतीची ही एक सवय होऊन जाते, त्यामुळेच मनाची लवचिकता कमी होते,आपण सवयीने एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत राहतो।

ही सवय लागते म्हणजे नक्की काय होते हे कोडे मेंदू तज्ञांनादेखील पडते आणि त्याचे उत्तर ते शोधत आहेत। आधुनिक तंत्रज्ञान वापरून मेंदूचे गूढ उकलले जात
आहे, त्यामुळे अनेक जुन्या प्रश्नांची नवीन, शास्त्रीय उत्तरे मिळत आहेत।सवयी आणि अंतर्मन यांचा काही संबंध आहे का हा असाच एक प्रश्न। ज्ञानेश्वरानी जाणीव आणि नेणिव असे शब्द वापरले होते। ही नेणिव म्हणजे फ्रॉइड ने सांगितलेले अनकॉन्शस माईंड। हे अनकोशन्स, म्हणजेच जाणिवेच्या कक्षेत नसलेले मन म्हणजे काय, यावर मेंदूतील कार्ये समजून घेताना प्रकाश पडू लागला आहे। या विषयावर खूप संशोधन होते आहे, ते इंटरनेटवर आणि पुस्तकांतून जगासमोर येत आहे। पण ती माहिती बऱ्याच वेळा शास्त्रीय भाषेत आणि समजायला थोडीशी अवघड असते।

आता ही अडचण दूर होणार आहे। तुम्हाला ती माहिती मराठीत आणि सोप्या भाषेत वाचायला मिळणार आहे। या माहितीचा उपयोग रोजच्या जीवनात
होण्यासाठी काही सोप्या टीप्सहि येथे दिल्या जातील। स्वप्नांचा आणि अंतर्मनाचा काही संबंध आहे का, भीतीदायक स्वप्नांचा ससेमिरा कसा दूर करायचा, आपल्याला अचानक अकारण उदास वाटू लागते ते का, एकाचा राग दुसऱ्यावर का काढला जातो अशा अनेक प्रश्नांची चर्चा काही उदाहरणे घेऊन येथे केली जाईल।सवयी बदलण्यासाठी काय करायचे, सजगतेचे म्हणजे माईंडफूलनेसचे आणि सवयीचे काय नाते आहे याची मेन्दू संशोधनाने मिळणारी उत्तरे येथे मिळतील। तुमच्या मनात अन्य काही प्रश्न असले तर ते तुम्ही विचारू शकता, त्यांचे निरसन केले जाईल।प्रत्येक महिन्यात असे दोन लेख तुम्हाला वाचायला मिळतील। या पुढील एक वर्षात असे 24 लेख तुम्हाला मिळतील त्यासाठी एक वर्षाचे फक्त रु 50 देऊन तुम्ही वर्गणीदार होऊ शकता। सवयीमुळे आपण मेंदूचे गुलाम राहतो, त्याचे स्वामी होण्याचे विज्ञानसिध्द उपाय तुम्हाला येथे कळणार आहेत।

पुनश्च चे हे "लेखकनिहाय विशेष सभासदत्व"  १ वर्षासाठी आपल्याला आवडत्या लेखकांच्या इतर कुठेही प्रसिद्ध न झालेल्या लेखांचा अमुल्य खजीनाच उपलब्ध करते. आपण पूर्ण लेख वाचू शकता, फोटो व एनरिचमेंटसहीत! शिवाय आपण आमच्या तारांकीत लेखकांना थेट प्रतिक्रिया देऊ शकता, चर्चेत सहभागी होऊ शकता व आपले साहित्यविश्व अधिक समृद्ध करू शकता..