ललित
साहित्य आणि प्रकाशन- ग्रंथ विश्वातील एक विश्वासू नाव म्हणून ललित सर्वदूर ओळखीचे आहे. गेली ५७ वर्षे सातत्याने ललितने हे स्थान टिकवून ठेवले आहे. पुस्तकांचा परिचय, साहित्यिक घडामोडी, साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रातील कर्तृत्वाची योग्य दखल आणि पुस्तकांच्या जाहिराती ही ललितची वैशिष्ट्ये. 'ठणठणपाळ'ने दीर्घकाळ ललितला हास्यरेषा दिल्या. त्यानंतर अलाणे-फलाणे, गोमा गणेश, आनंद पुणेकर यांनी ती परंपरा सुरु ठेवली. ललितमध्ये अलिकडेच याच पठडीतले 'झारा आणि सराटा' हे सदर सुरु झाले आहे.
पुनश्च चे सभासदत्व* घ्या.