पुनश्च : सशुल्क मराठी डिजिटल नियतकालिक

मित्रांनो, फ्रेंडशिप डे, रोज डे, व्हलेंटाईन डे यांचे कितीही मार्केटिंग झाले असले तरी आजची तरुणाई त्याजोडीने आपली पारंपारिक दिवाळी आणि गणपती तितक्याच उत्साहाने साजरे करते. कारण बदलांना सामोरे जाताना मूल्यांची नाळ न सोडणे हा समाजाचा अंगभूत स्वभाव असतो.
स्मार्टफोन्स, टॅब्ज, कींडल्स आणि इंटरनेटच्या या डिजिटल युगात छापील पुस्तकांचे महत्व म्हणूनच टिकून आहे. मात्र जमाना इतका प्रवाही आणि वेगवान झाला असताना त्या छापील वाङ्मयाचा आनंद डिजिटल स्वरूपात घेणे गरजेचे झाले आहे. लिखित साहित्याचे जतन आणि संवर्धनासाठी डिजिटल मिडीया हाच पर्याय आहे.
याच मिडीयाचा वापर करून पुनश्चने मराठीतील पहिले सशुल्क डिजिटल नियतकालिक, वेब-पोर्टल आणि 'अॅन्ड्रॉइड अॅप' च्या दुहेरी रुपात आणले आहे. [ हो, लवकरच आमचे iOS अॅपही येऊ घातले आहे]. इथे मराठीतील महत्वपूर्ण, कालसुसंगत आणि विचारप्रवृत्त करणारे साहित्य, दर आठवड्याला २ निवडक लेखांच्या स्वरूपात (बुधवार आणि शनिवार), आपणास वाचावयास मिळेल. अनुभव कथन, चिंतन, व्यक्ती-संस्था परिचय, कविता/पुस्तक/चित्रपट/कला रसास्वाद इ. अनेक सदरातील उत्कृष्ट लेखांचा आनंद आपण घेऊ शकाल.

पुनश्च डिजिटल नियतकालिकामध्ये आपणास दर आठवड्याला २, असे वर्षभरात १०४ निवडक लेख वाचावयास मिळतील..

अनुभव-कथन, चिंतन, व्यक्ती-संस्था परिचय, कविता/पुस्तक/चित्रपट/कला रसास्वाद इ. २१ अभ्यासपूर्ण सदरातील लेखांचा आनंद घेऊ शकाल.

वाचायलाच हवे असे निवडक लेख...

ह्या विभागात संपादक मंडळाकडून शिफारस केलेले विशेष लेख दाखवले जातील. ह्या विभागातील प्रत्येक लेख आशयगर्भ, विस्मयकारक व १००% वाचनीय, संग्राह्य असेल ह्याची खात्री "पुनश्च"चे संपादक मंडळ करेल. मराठी साहित्यातील काही अमर साहित्य वेचून पुन्हा रसिक लेखकांसाठी उपलब्ध करण्याचा हा खटाटोप!

आजवर आम्हाला भरपूर वाचकांनी त्यांना वाचायला अजून काय आवडेल ते कळवलं. कोणी फोनवरून कळवले, तर कोणी मेसेज करून. कोणी whatsapp वर तर कोणी एखाद्या लेखाखाली कमेंट मध्ये. पण त्याची नोंद एकाच ठिकाणी न झाल्यामुळे अडचण येत आहे. वाचकांची आणि पर्यायाने आमचीही सोय व्हावी म्हणून वाचकांना हे आवाहन...

अवांतर

पितृपक्ष
लेखक: आचार्य अत्रे हा काळ पितृपक्षाचा आहे. त्यामुळे पितरांबरोबरच कावळ्यांचेही महत्त्व आपोआप वाढले आहे. संयुक्त …
>>>>

तरुण मुले सैराट का वागतात
लेखक: डॉ यश वेलणकर ओजस बारावीला आहे. तो क्लासला जायला म्हणून घरातून बाहेर पडला, पण …
>>>>

 || श्री नवभागवतपुराणम् ||
 || श्री नवभागवतपुराणम् || |आता श्रोतेहो धरा ध्यान | आणा आपुले इकडे कान | हरपू …
>>>>

असा झाला पहिला गणेशोत्सव
तो दिवस होता ख्रिस्ताब्द १८९३ (श्रीशके १८१५) च्या श्रावण महिन्यातील शेवटच्या आठवड्याचा. श्री. वैद्य भाऊसाहेब …
>>>>

सोशल मिडीया..

गोविंदविडा

विविध पदार्थांविषयी आपल्याला सोशल मिडीयावर नेहमी वाचायला मिळतं. पण मुखशुद्धी म्हणून खाल्ला जाणारा विडा, गौरी – महालक्ष्मी च्या वेळी लागणारा …
Read More

कळावे, आपलाच गणपती बाप्पा !

होय मला गोड धोड खायला आवडतं. माझ्या बाबांप्रमाणे मी सिक्स पॅकवाला नाही. पण वर्गणीच्या नावाने धाकदपटशा करून खाल्लेला पैसा हा …
Read More

शरद जोशी- एक स्मरण

निमित्त- शरद जोशी यांची जयंती ( ३ सप्टेंबर १९३५ ) **** “तुझे पत्र कालच सुरेशचंद्र म्हात्रे यांनी दाखवले. पत्रातील तुझी …
Read More

उकडीचे मोदक

कोकणात मोदकाचा उल्लेख ‘उकडीचा मोदक’ असा करणं म्हणजे पिवळा पीतांबर म्हणण्यासारखं आहे. मोदक म्हटला की तो उकडीचाच. चवीच्या बाबतीत हा …
Read More