स्टालिनच्या क्रूर धोरणाचें समर्थन करण्याची मला मुळींच इच्छा नाहीं. पण लोकशाहीची माहेरघरे मानल्या गेलेल्या इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका वगैरे राष्ट्रांत क्रांत्या झाल्या तेव्हां कमीअधिक प्रमाणांत भयंकर क्रूर कृत्ये राज्यकत्यांनीं केलींच. तेथले असंतोषाचे, दडपशाहीचे व क्रूरपणाचे वणवे विझून त्या त्या देशांत शांतता व लोकशाही स्थापन होण्याला शंभरदोनशे वर्षांहून अधिक मुदतीइतका काल जावा लागला. शिवाय त्या त्या देशांत राष्ट्रीय विकास चालू असतां वरिष्ठ वर्गाने आपल्या नफेबाजीसाठी जनतेची पिळवणूक जी केली तीहि शंभर वर्षे तरी चालली असून तींत क्रूरपणा कमी नव्हता. लोकशाहीहि दीर्घकाल नामधारीच होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .