मी पुण्यांतल्या घराच्या पिंजऱ्यांतून उडून नुकता कुठे मुंबईच्या रानांत आलों होतों. अक्कल आहेहि आणि नाहींहि अशी माझी अधली मधली अवस्था होती, हक्काचे सव्वाशे रुपये मिळवूं लागलों होतों. त्याचा आत्मविश्वास अंगांत भरलेला होता. आणि अनुभव कांही नव्हता. राहायला एका खोलीचा एक तृतियांश भाग होता, पण त्यांत माझें घर' नव्हतें, निवाऱ्याची भावना नव्हती. होती केवळ डोकें आणि ट्रंक-वळकटी टेकायला जागा. आणि मला अनंतकुमार भेटला. मला हवें असलेलें 'घर' अनंतकुमारकडे होतें. तें त्याला कोणाला तरी द्यायचें होतें. मला तो तसें म्हणाला आणि अशा शब्दांत, अशा सुरांत म्हणाला कीं, माझा सारा प्रश्नच सुटला, अडचण दूर झाली, फिकिरीचें कांहीं कारणच उरलें नाहीं असें मला वाटलें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .