डॉ. केतकरांची तुलना डॉ. जॉन्सन आणि वि. का. राजवाडे यांच्याशी नेहमीं केली जाते. मराठीचा आणि महाराष्ट्राचा निस्सीम अभिमान, दुर्दम्य आशावाद, विक्षिप्तपणा, निस्पृहपणा या बाबतींत ते राजवाड्यांशी तुलनीय होते. त्यांच्या आणि राजवाड्यांच्या विक्षिप्तपणातला फरक इतरांनी दाखवला आहे. या बाबी सोडल्या तर या दोघांत सारखेपणा दाखवणे दूरान्वय होईल, कारण राजवाड्यांनी आपल्याला मुख्यतः संशोधनालाच वाहून घेतले असून, केवळ प्रसंगवशात् ते इतर विषयांना हात घालीत, तर उलट केतकरांच्या सर्व लेखनाचा मूळ हेतूच लोकांना प्रत्येक गोष्टीवर विचार करायला लावावें हा. त्यांच्या विद्वत्तेची बैठक राजवाड्यांच्याहून अधिक लांबरुंद आणि त्यांचा दृष्टिक्षेप अधिक व्यापक आणि दूरगामी होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


















