मग एकाएकी भान आल्यासारखे करून त्याने मला याच्या वळकटीवर, ती 'ठाकून ठोकून, एक तात्पुरती बैठक तयार करून दिली आणि तो शर्ट तुमानीबाहेर काढून कामाला लागला. त्याने एक वर्तमानपत्र घेतले आणि त्याने झडाझडा खोलींतला केर चारी भिंतीशीं झटकला. ते करताना तो म्हणाला, “वास्तविक इथें कामाला एक म्हातारी बाई आहे. पण ती फार जुनी आहे. इथें आल्यापासून ती आमच्याकडे आहे. आता ती कधीं येते, कधीं येत नाहीं. तब्बेतीची तक्रार असते तिची. पगार मात्र घेते. मीहि देतों. म्हातारे माणूस आहे." मग वर्तमानपत्र झटकून आणि परत मूळ ठिकाणी ठेवून त्याने भराभरा सारे विस्कळीत सामान एकीकडे सरकावलें. त्यानंतर मला लांकडी पेटाऱ्यावर जागा देऊन त्यानें पोटांत बेसुमार फुगलेली वळकटी खोलली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .