'प्रिय विजय, मी बत्तिस शिराळ्यास मुलांकडे जात आहे. निर्णय घेतला आहेच. अखेरीची धडपड केली. डेड-लाइन संपली तेव्हां प्रतिकार थांबवला. ज्याला त्याला शेवटीं त्याच्या ठरल्या मार्गाने गेलेच पाहिजे. त्यांत सवलत नाहीं. मलाहि नाहीं. प्रवासाच्या पैशांची सोय झालेली नाहीं. तुझ्याकडे मागणार होतो; पण ठरवलें कीं नाहीं मागायचें. मागायचें तरी किती ? परत केव्हां येणार सांगत नाहीं. कदाचित येणारहि नाहीं. आणि त्यांत बिघडले काय ? अखेर अनंतकुमार म्हणजे अशोककुमार नव्हें, दिलीपकुमार नव्हें. अनंतकुमार म्हणजे अन्त्या दंडवते. पांचवीत शाळा सोडलेला. खिशांत चार आणे ठेवून मुंबईत पळून आलेला सुतार म्हणून आयुष्याला आरंभ केलेला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .