संशोधनाविषयीं आणि शास्त्राभ्यासाविषयी ते जें बोलत, त्याला अनुसरूनच त्यांनी आपली कार्ये आंखलीं होतीं. जातिभेदाचा इतिहास संशोधायचा तो तात्त्विक काथ्याकूट करण्यासाठीं नाहीं तर, सध्यां जातिभेद राष्ट्राच्या बलसंवर्धनाला अत्यंत मारक होत आहे, तेव्हां ज्या कारणांनीं जातिभेद अस्तित्वांत आला तीं कारणें शोधून नाहींशीं करण्यासाठी त्यांनीं, आपले विविध लेख लिहिले ते लोकांत सर्व प्रकारची जागृति व्हावी म्हणून. आणि कादंबऱ्याही लिहिल्या त्या यासाठींच. त्यांनी ज्ञानकोश रचला तो, फ्रेंच इतिहासांत दिदेरोचा ज्ञानकोश जसा क्रांतीचा अग्रदूत ठरला तसाच केवळ नाहीं तरी, निदान विविध विषयांची उपलब्ध माहिती निवळ मराठी जाणणाऱ्यांना सुलभ करून देऊन महाराष्ट्राची संस्कृति वाढावी या हेतूनें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .