ते संरक्षणमंत्री होत असल्याचें अशोक मेहतांनीं शिवाजी पार्कवर भरलेल्या सभेत जेव्हां सांगितले तेव्हांचा प्रसंग सभेला हज़र असलेले कधीं विसरणार नाहींत. अशोक मेहतांचें भाषण चालू असतांनाच यशवंतराव संरक्षणमंत्रीपद स्वीकारणार असल्याचें त्यांना सांगण्यांत आलें. तेव्हां अशोक मेहतांनी ही वार्ता सभेला सांगितली व आनंदानें त्यांना पुढे बोलतांच येईना आणि त्या प्रचंड सभेत केवढे चैतन्य पसरलें, लोकांनी टाळ्यांचा किती वेळ कडकडाट केला आणि शिंगवाल्यांनी शिंगे फुंकलीं! खरोखर तो प्रसंग अनुभवण्यासारखाच होता. जो आनंद शिवाजी पार्कवर व्यक्त झाला तोच साऱ्या महाराष्ट्रांत व देशांत व्यक्त व्हावा एवढा विश्वास यशवंतरावांनी संपादन केला आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .