ययातीनें पुन्हां माधवीच्या डोळ्यांत खोलवर निरखून पाहिलें, त्यानें तिचे दोन्ही दंड घट्ट पकडले. पण तरीहि तिचा देह आपल्या हातांत नाहीं, तो दूर कुठे तरी सुटून गेला आहे आणि क्षितिजाच्या पैलतीरावरून ती आपल्याकडे करुणेनें, काहीशां अनुकंपेने बघत आहे, असा त्याला भास झाला. आणि मग एका क्षणांत त्याला जीवनाचे रहस्य उलगडलें. माधवी मर्त्य होती. मृत्यूच्या डोळ्याला डोळा देऊन तिनें त्याचें स्वरूप निरखून पाहिलें होतें. आणि म्हणूनच जीवनाचा अर्थ तिला कळला होता. इहलोकांतील यच्चयावत् सुखांवर मृत्यूची अनिवार्य छाया पडलेली होती. आणि म्हणूनच त्या सुखांना आगळी गोडी प्राप्त झाली होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .