पेटी बंद केली तेव्हां चोरट्यासारखें वाटत होतें, मी गुन्हा केला हें मनाला डांचत होते; पण एकीकडे हलके आणि बरें वाटत होतें. पुष्कळ शंका दूर झाल्या, पुष्कळ कळलें याचें सुख वाटत होतें. अनंतकुमार आतां मला फारसा अनाकलनीय राहिला नव्हता. याहि मार्गानें मी त्याच्या अधिक जवळ पोंचलों होतों. त्याची सुखदुःखे मला चांगली समजूं लागली होती; परिस्थिति समजत होती. आणि ती अत्यंत निराशजनक, शोचनीय आणि न सुधारणारी आहे हें पुरतेपणीं समजण्याएवढी अक्कल जवळ नव्हती; अनुभव तर नव्हताच नव्हता. मी अनंतकुमारच्या अधिक जवळ पोहोचलो हाच आनंद दीर्घकाले मन भरून राहिला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .