"का बरं ? आत्मा म्हणजे शरीराचं झुळझुळीत वस्त्र. तापदायक होतं सांभाळणं. ते झुळझुळीत वस्त्र जपावं लागतं, सारखं तैनातीत राहावं लागतं. त्याचाच फक्त विचार. कुठं ते वस्त्र बाजूला होईल आणि आपल्याला लाज वाटेल, शरम वाटेल. लक्तरं लोंबायला लागली की पुन्हा सर्वांना हळहळ, दया आपल्याबद्दल. आणि ही लक्तरं गोळा करण्याचं आम्हाला एक कामच. उपद्रव होतो मग. कंटाळलोय मी. ते वस्त्र उचला. म्हणजे मी एकदम रिकामा. काहीही करायला मग काही हरकत नाही. नाहीतरी देवा, तुम्ही म्हटलंच आहे ना कुठल्याशा तुमच्या पोथीत–वासांसि जीर्णानि... मग आता का माघार ?"
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .