एखादा चित्रपट पहाण्याची शिफारस तो मला करी तेव्हां तें दोन गोष्टींचें सूचक असे. एक : तो खुषीत आहे. आणि दोन : त्याला तो चित्रपट पहायचा आहे. चित्रपट पाहून आल्यावर तो विशेष अस्वस्थ आणि तरीही खुषीत असे. त्याबद्दल तो तासन्तास बोलत राही. तसें हिंदींत व्हायला पाहिजे म्हणे. त्याचें तांत्रिक सौंदर्य समजावून सांगे. त्यावरून त्याला भरारा कल्पना सुचूं लागत. तोच लेखक, दिग्दर्शक, छायाचित्रकार, संगीतदिग्दर्शक, नट, नटी, सारें कांहीं होई. अनेकदां पहांट फटफटली तरी त्याचें बोलणें आणि माझें ऐकणें संपत नसे. दोनचार चित्रपट तयार होऊन राष्ट्रपतीपदाला पात्र ठरत वा 'क्लिक' होत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .